प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लष्कारत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्करातील 191 पदांसाठी भरती आहे. यासाठी उमेदवार सैन्यदलाची अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची मुदत 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. Indian Army Recruitment 2023: Job Opportunity in Indian Army; Apply
भारतीय लष्कराने जारी केलेल्या भरती मोहिमेद्वारे, भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/काॅम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि इतर विहित पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अधिसुचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि पदानुसार कमाल वय 27/35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
कशी होणार निवड?
भरती प्रक्रियेतील पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी शाॅर्टलिस्टिंग प्रक्रिया/ SSB मुलाखत / वैद्यकीय चाचणी आयोजित केली जाईल. एसएसबी मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
‘असा’ करा अर्ज?
अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार ऑफलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करु शकतात. याशिवाय, उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App