विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील केल्यावर कोणती भूमिका द्यायची याबाबत गांधी परिवारातील राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा त्याला विरोध असून प्रशांत किशोर हे तर फुस्स बॉँब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Opposition to Prashant Kishor’s entry into the Congress, senior leaders sayhe is a fuss bomb
प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षाच्या बड्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रशांत किशोर म्हणजेच ‘फुस्स बॉम्ब’ म्हटले आहे. एका नेत्याने सांगितले की ते काँग्रेसमध्ये सामील झाले, तर काँग्रेस जिंकणार नाही पण भाजप नक्कीच जिंकेल. कॉँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत. मात्र, त्यांच्याकडे दूर्लक्ष केले जात असून त्याचाच फटका बसत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन बन्सल म्हणतात की प्रशांत किशोर यांच्या आगमनाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. मात्र, त्यांनी सर्वांसोबत काम करेल तरच पक्षाला फायदा होईल.प्रशांत किशोर यांचा कॉँग्रेस प्रवेश केवळ औपचारिकता राहिला आहे. पण त्यांना मोठे पद देणे जुन्या कॉँग्रेस नेत्यांना आवडणार नाही याची राहुल गांधींनाही कल्पना आहे.
मात्र ते आणि प्रियंका गांधी किशोर यांच्या प्रवेशाबाबत उत्साहित आहेत.जुन्या काँग्रेसजनांची नाराजी पाहता सोनिया गांधी यांचाही पीके यांच्या प्रवेशाला विरोध आहे. मात्र, राहुल गांधी त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यामुळे सोनिया गांधी पीके यांना पक्षात आणण्याचा असा मार्ग शोधत आहेत,
जेणेकरून वरिष्ठ नेत्यांची नाराजीही थोडी कमी होईल आणि राहुल गांधींचा आग्रहही पूर्ण होईल.प्रशांत किशोर यांना पक्षात रणनीतीकार म्हणून समाविष्ट करण्याऐवजी त्यांना सल्लागाराची भूमिका देण्याबाबत चर्चा सुरू आहे. वास्तविक, राहुल गांधींनी त्यांना निवडणूक रणनीतीकार म्हणून पक्षात समाविष्ट करण्याचा विचार केला होता.
त्यांना निवडणुकीची संपूर्ण कमांड त्यांच्या हातात सोपवायची होती. जर असे झाले असते तर पीके निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला थेट सूचना देऊ शकतात.त्याला कॉँग्रेसचे नेते विरोध करतील आणि पुन्हा एकदा जी-२३ सारखी नाराजी निर्माण होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App