विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : केरळमधील कन्नूरस्थित सोने तस्करी टोळीशी सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या विरोधी पक्षांनी सत्तारूढ सीपीआय-एम पक्षावर जोरदार हल्ला केला. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या मुद्द्यावर समोर येऊन बोलावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.Opposition targets Kerala government over links to gold smuggling gang
कन्नूरस्थित सोने तस्करांचे सीपीआय-एमशी संबंध असल्याचे प्रसारमाध्यमातून उजेडात आल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवरील हल्ला अधिक धारदार केला आहे. पाच जणांच्या टोळीतील एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मृत व्यक्तीचे तस्करांशी संबंध असल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले. यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यातील विशेष टोळ्या आणि अंडरवर्ल्ड माफियांना अभय देत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
काँग्रेसने आरोप केला की, सत्तारूढ पक्ष सर्व विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी सीपीआय-एमवर निशाणा साधत राजकीय नेत्यांचे तस्करांशी असलेले संबंध आणि गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रसारमाध्यमे दररोज सीपीआयएमच्या गुन्हेगारी संबंधाचा पदार्फाश करीत आहेत. यावरून जे लोक विविध डिजिटल व्यासपीठावरून पक्षासाठी सायबर गुंडगिरी करतात, ते गुन्हेगार आहेत किंवा अलीकडेच उजेडात आलेल्या विविध गुन्ह्यांचे सूत्रधार आहेत.
सत्तारूढ पक्ष तस्करी, राजकीय नेत्यांची हत्या आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यातील लोकांचा बचाव करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन सोने तस्करीवरून सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, याची पाळेमुळे माकपा मुख्यालय एकेजी सेंटरमधून मिळू शकतात. केरळ गुन्हेगारी टोळींचे आश्रयस्थान बनले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App