सोने तस्करी प्रकरणाला केरळमध्ये वेगळेच वळण, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांवरच पोलिसांची कारवाई


विशेष प्रतिनिधी

तिरूअनंतपुरम : केरळमधील बहुचर्चित सोने तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्वप्ना सुरेश हिला मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याविरोधात जबाब द्यायला भाग पाडल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Gold smuggling case takes a different turn in Kerala, police crackdown on ED officials

याप्रकरणी जो एफआयआर दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘‘ ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरेश यांची मागील वर्षी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी चौकशी केली होती,यावेळी त्यांनी तिला मुख्यमंत्र्यांविरोधात चुकीचा आणि खोटा जबाब देण्यास भाग पाडले होते.’’ सध्या या प्रकरणाची ‘ईडी’प्रमाणेच सीमाशुल्क विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) देखील चौकशी सुरू आहे.

दरम्यान विजयन यांनी याआधीच केंद्रीय तपास संस्थांच्या तपासावर प्रश्नुचिन्ह उपस्थित केले होते.राज्याच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मात्र या कारवाईबाबत आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचे म्हटले आहे.

Gold smuggling case takes a different turn in Kerala, police crackdown on ED officials

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था