विरोधी ऐक्यासाठी दिल्लीत बैठका; पण कर्नाटकात काँग्रेसला देवेगौडा – राष्ट्रवादीकडून तिरंगी लढतीचा फटका!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशपातळीवर केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध विरोधकांची एकजूट व्हावी म्हणून राजधानी नवी दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू होऊन दोनच दिवस झाले नाहीत, तोच त्या विरोधी ऐक्याला कर्नाटकातून सुरुंग लागला आहे. तो सुरुंग देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लावला आहे. त्यांनी कर्नाटकात काँग्रेसला तिरंगी लढतीचा फटका दिला आहे. Opposition strongly efforting for unity in Delhi, but failed to Unitedly fight with BJP in karnataka

दिल्लीत विरोधी ऐक्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये आधी नितीश कुमार, तेजस्वी यादव, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे लल्लनसिंह हे सहभागी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल हे सहभागी झाले. या सर्व नेत्यांनी एकमेकांचे हात धरून विरोधी ऐक्य मजबूत करण्याचा संकल्प केला.

पण हा संकल्प एकीकडे होत असतानाच दुसरीकडे त्याच विरोधी ऐक्याला कर्नाटक राज्यातून मोठा सुरूंग लागला आहे आणि हा सुरुंग लावण्याची कामगिरी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने बजावली आहे.

राष्ट्रवादी कर्नाटकात 45 जागा लढवणार

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात स्वतंत्रपणे 45 जागा लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा “राष्ट्रीय” दर्जा गेल्याने महाराष्ट्र बाहेरच्या राज्यांमध्ये निवडणुकीत जागा जिंकण्यासाठी सोडाच, पण निदान मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी तरी प्रयत्न केला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे. अर्थात त्यासाठी त्यांना काँग्रेसशी युती करण्याचा पर्याय होता. पण त्या पर्यायातून फारच थोड्या जागा पदरात पडल्या असत्या म्हणून काँग्रेसशी आघाडी करण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे 45 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेगौडा डाव्यांच्या बाजूने उभे राहणार

देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने काँग्रेस बरोबर युती करायचे नाकारून स्वतंत्र उमेदवार आधीच उभे केले आहेत. त्या पुढे जाऊन आता देवेगौडांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी ऐकण्यापेक्षा फक्त डाव्या पक्षांबरोबर उभे राहण्याचे ठरविले आहे. विरोधी ऐक्याचे काय होईल माहिती नाही पण आपण म्हणजेच धर्मनिरपेक्ष जनता दल डाव्या पक्षांच्या बाजूने उभे राहू, असे देवेगौडांनी स्पष्ट केले आहे.

ही तिरंगी सामन्याची सुरुवात

याचा अर्थ मूळात मोदी विरोधात सर्व विरोधकांचे ऐक्य होत नाही आणि ऐक्य झालेच तर ते टिकत नाही. ते टिकलेच तर दोन शकले होऊन ते टिकते, असा होतो आहे. हा सत्ताधारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी, काँग्रेस प्रणित युपीए आघाडी आणि सर्व डावे पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांची तिसरी आघाडी असा तिरंगी सामना यातून समोर येतो आहे. म्हणजेच भाजप विरोधात दिल्लीत यमुनेच्या किनाऱ्यावर होत असलेले विरोधी ऐक्य कर्नाटकातील कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा, घटप्रभा नद्यांमधून वाहून जात आहे.’

Opposition strongly efforting for unity in Delhi, but failed to Unitedly fight with BJP in karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात