विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुठलीही टीका किंवा कृती विरोधकांना झुंबत होतीच, पण आता त्यांचे मौन आणि ध्यानधारणाही विरोधकांना टोचत आहे. Opposition barked over Modi’s meditation
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सगळी रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत पोहोचले. तिथे देवदेवतांची दर्शने घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद रॉक वर जाऊन त्यांनी ध्यानधारणेला सुरुवात केली. या दरम्यान ते मौनात असणार आहेत. मोदींच्या ध्यानधारणेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले.
४६ सेकंदात २० अँगल…जगावेगळं "ध्यान" आहे हे ! pic.twitter.com/Q6NWVoRBrz — Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 31, 2024
४६ सेकंदात २० अँगल…जगावेगळं "ध्यान" आहे हे ! pic.twitter.com/Q6NWVoRBrz
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 31, 2024
पण या सगळ्या प्रकारामुळे मोदींचे विरोधक चिडले आणि त्यांनी मोदींच्या ध्यानाधारणेवरून देखील त्यांच्यावर टीका केली. एरवी मोदींची कुठलीही टीका किंवा कृती विरोधकांना झोंबतच होती. पण निदान तेव्हा मोदी टीका करताना उघडपणे बोलत होते. आता मात्र ते ध्यानधारणा आणि मौनात आहेत. प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर त्यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही, तरी देखील मोदींवर विरोधकांनी शरसंधान चालविले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवर मोदींच्या ध्यानधारणेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे, 46 सेकंद, 20 अँगल जगावेगळे “ध्यान”, अशा शब्दांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने मोदींच्या ध्यानधारणेची खिल्ली उडविली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मोदींवर टीका केली आहे. मोदींनी आता इथून पुढे ध्यानधारणा करतच बसावे. लोक इकडे महागाई आणि बेरोजगारीमुळे हैराण आहेत मोदी ध्यानधारणेला बसले आहेत आणि प्रसार माध्यमे दिवसभर तेच दाखवत आहेत ही चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी नोंदवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App