वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीतले ढळढळीत अपयश डोळ्यासमोर दिसत असताना देशातले विरोधक आणि अर्बन नक्षल एकत्र येऊन देशात काहीतरी अघटित घातपात करण्याचा डाव रचत आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातल्या धारवाडच्या जाहीर सभेत केला. Opponents plan to attack the country using artificial intelligence
काँग्रेस सारखा प्रमुख विरोधी पक्ष पूर्णपणे अर्बन नक्षलवाद्यांच्या ताब्यात गेला आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांवर अर्बन नक्षलवाद्यांनी पूर्ण कब्जा केला आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस सह सर्व विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या सगळ्यांना लोकसभा निवडणुकीतला पराभव दिसतो आहे आणि हा पराभव पाहूनच त्यांची माथी भडकली आहेत. त्यातून ते अर्बन नक्षली विचारातून देशात काहीतरी अघटीत घातपात घडविण्याचे कारस्थान रचत आहेत. पुढच्या महिन्यात देशात घातपात घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, हे मी अत्यंत गांभीर्याने तुम्हाला सांगतो आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून माझे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे डीपफेक व्हिडिओ बनवून देशात संभ्रम पसवण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत, याकडेही मोदींनी लोकांचे लक्ष वेधले. विरोधकांच्या संभ्रमाच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यातून केवळ ते राजकीय वक्तव्य असल्याचा वास नाही, तर त्याहीपेक्षा काही गंभीर घडण्याची विशिष्ट माहिती त्यांना मिळाल्याचेच यातून दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्वे विरोधकांचा पराभव आणि मोदींचा विजय याकडे अंगुली निर्देश करतात या पार्श्वभूमीवर मोदींच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App