ओपिनियन पोल मधून आली ठाकरे + पवारांना हादरवणारी बातमी; महाविकास आघाडी फक्त 3 जागांवर थांबली!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा राजकीय धुमाकूळ सुरू असताना, ठाकरे + पवार हे शिंदे – फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल करत असताना, मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आई माई वरून शिव्या घालत असताना महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्मिती व्हायचे, तर सोडाच उलट ठाकरे पवारांना हादरवणारी बातमी एका ओपिनियन पोल मधून समोर आली आहे.Opinion poll crashes thackeray pawar’s political dream

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा व्हायच्या आधीच Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला असून त्यामधून ठाकरे पवार यांच्यासह काँग्रेसच्या महाविकास आघाडीला अवघ्या 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थ भाजपने आधीच टार्गेट ठेवल्यानुसार महाराष्ट्रात भाजप महायुतीला तब्बल 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. याच ओपिनियन पोल मध्ये वर्तविण्यात आली आहे.केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकारी येईल असा निष्कर्ष ओपिनियन पोल मधून समोर आला असला तरी त्यात फारशी काही मोठी बातमी नाही, पण महाराष्ट्रात काँग्रेस सह ठाकरे + पवार एकत्र असताना, मनोज जरांगे पाटलांचा मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला असताना महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध काहीही वातावरण निर्मिती होऊ शकली नाही ही खरी या ओपिनियन पोल मधून बाहेर आलेल्या निष्कर्षाची बातमी आहे.

महाराष्ट्रात कोणाला किती जागा?

या ओपिनियन पोलनुसार आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार गटाला 48 पैकी 45 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये 7 आणि मतांमध्ये 4.6 % वाढ होईल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा 6 ने कमी होतील आणि मतांमध्ये 4.1 % घट होईल.

अजित पवार गट एनडीएत सहभागी झाल्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल असं विचारण्यात आलं असता 28 % लोकांना फार तर 32 % लोकांना काही प्रमाणात असं मत नोंदवलं आहे, तर 22 % लोकांनी नुकसान होईल असं म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता 36 % लोकांनी आपण काही प्रमाणात संतृष्ट असून, कामकाज ठिकठाक असल्याचं म्हटलं आहे, तर 32 % लोकांना कामकाज चांगलं असून, फार समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर 26 % लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं मत नोंदवलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वात चांगलं काम केल्याची पावती देण्यात आली आहे. 44 % टक्के मतं एकनाथ शिंदे, 36 % मतं देवेंद्र फडणवीस आणि 20 % मतं उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत.

ओपिनियन पोलचा DISCLAIMER :

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. ज्यामध्ये 87 हजार पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय या ओपिनियन पोलमध्ये 27 हजार नवमतदारांची मतंही समाविष्ट करण्यात आली आहेत. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.

Opinion poll crashes thackeray pawar’s political dream

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात