Operation Ganga : हवाई दलाच्या सी – १७ विमानाने रुमानिया, स्लोव्हाकिया, पोलंडमधून ६२९ विद्यार्थ्यांना आणले परत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर Operation Ganga अंतर्गत रुमानिया, स्लोव्हाकिया, पोलंडमधून ६२९ विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाच्या सी – १७ विमानांनी भारतात आज सकाळी परत आणण्यात आले. operation ganga : 629 indian students brought back from war torn ukrine

आत्तापर्यंत ११००० हजार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षित भारतात आणण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनी दिली होती. एकूण २०००० भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. ते सध्या पोलंड, रुमानिया, स्लोव्हाकिया आदी देशांमध्ये सुरक्षित आहेत. ऑपरेशन गंगा या अभिय़ानातून उर्वरित विद्यार्थ्यांनाही भारतात परत सुरक्षित आणण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.



भारतीय हवाई दलाची ३ सी – १७ विमाने सध्या ऑपरेशन गंगामध्ये सहभागी करण्यात आली आहेत. त्यामुळे एका वेळी ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि त्यांचे सामान यांची वाहतूक सुरक्षित होते. अशा पध्दतीने आतापर्यंत हवाई दलाच्या विमानांनी १० फेऱ्या केल्या आहेत. गरजेनुसार फेऱ्या वाढवून लवकरात सर्व भारतीयांना परत आणण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

operation ganga : 629 indian students brought back from war torn ukrine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात