नाशिक : भारताने “ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire अर्थात शस्त्रसंधी किंवा युद्धविराम झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी ceasefire संदर्भात ट्विट केली. अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire अर्थात शस्त्रसंधी किंवा युद्धविराम झाल्याचा दावा अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधल्या नेत्यांनी केला.
पण भारताने या संदर्भात दिलेल्या प्रतिसादात ceasefire अर्थात शस्त्रसंधी किंवा युद्धविराम शब्दच वापरले नाहीत. त्या उलट भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सविस्तर घटनाक्रमाचा उल्लेख करून पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांनी भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना फोन करून चर्चेची विनंती केली भारताने ती विनंती मान्य केल्यानंतर दोन्ही बाजूंनी सायंकाळी 5.00 वाजता firing आणि military action थांबविली, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर वर उल्लेख केलेले दोन्ही वरिष्ठ अधिकारी 12 मे 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता पुन्हा चर्चा करतील, असे सांगितले. विक्रम मिस्त्री यांनी आपल्या ब्रीफिंग मध्ये ceasefire हा शब्दच वापरला नाही.
त्यानंतर झालेल्या भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत देखील ceasefire हा शब्द वापरला गेला नाही. त्या उलट भारत आणि पाकिस्तानचे किती आणि कसे नुकसान केले याची सविस्तर माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात शब्द वापराला फार महत्त्व आहे कोणता शब्द कुणी कुठे वापरायचा त्याचबरोबर प्रथम कुणी काय बोलायचे याचा प्रोटोकॉल आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात अतिशय अचूकपणे पाळला जातो त्यातूनच राजनैतिक संबंधांचा स्तर आणि मधुरता सूचित केली जाते.
अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांनी ceasefire हा शब्द वापरणे आणि भारतीय राज्यकर्त्यांनी तो शब्द वापरण्याचे टाळणे याला विशेष महत्त्व आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी पाकिस्तानचा भारताला असलेला पूर्वानुभव कारणीभूत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात कायमच पाकिस्तानने भारताचा विश्वास तोडला. सर्व प्रकारच्या संधी आणि करार मोडले. पाकिस्तानने 1986 पासून “1000 cut कारस्थानानुसार दहशतवाद पोसून भारताविरुद्ध युद्ध छेडले, जे कधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर “युद्ध” मानले गेले नाही. उलट पाकिस्तानने “काश्मीरचे स्वातंत्र्ययुद्ध” हे लेबल लावून गेली तीन दशके भारताविरुद्ध युद्ध केले. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजनैतिक परिभाषेनुसार कुठलेच तत्त्व पाळले गेले नव्हते.
– पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच…
अशा स्थितीत ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्यावेळी पाकिस्तानचे कंबरडे मोडले गेले, भारताने पाकिस्तानात 100 किलोमीटर खोलवर घुसून हल्ले केले, त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट केले, पाकिस्तानातले 7 हवाई तळ उद्ध्वस्त केले, त्यावेळी पाकिस्तान भारतासमोर पुढच्या युद्धासाठी उभा राहू शकेल, याची शक्यताच उरली नव्हती. त्यामुळेच पाकिस्तानने प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा भारतावर फेक न्यूजचेच हल्ले केले. यापैकी कुठलेही हल्ले पाकिस्तान इथून पुढे देखील थांबविण्याची शक्यता भारताला वाटत नाही. कारण भारताला तसा पूर्वीचा अनुभव आहे. म्हणूनच भारतातल्या कुठल्याही नेत्याने अथवा प्रशासकीय अथवा लष्करी अधिकाऱ्याने आपल्या प्रेस ब्रीफिंग मध्ये ceasefire हा शब्दच वापरला नाही. कारण पाकिस्तान त्या शब्दाला जागेल, अशी भारताला खात्री वाटत नाही. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये firing आणि military action थांबविण्याचे लिहिले. नेमके तेच शब्द नंतरच्या प्रेस ब्रिफिंग मध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी रिपीट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App