वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : कोरोनाविरोधी लस घेतलेल्या लोकांवरच केरळमध्ये मोफत उपचार केले जातील, असा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री पिरनयी विजयन यांनी केली. Only people who have been vaccinated against Coronavirus will get free treatment in Kerala
केरळमध्ये कोरोना लसीकरण वेगाने होण्यासाठी आणि नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. जर लस घ्यायची नसेल, तर त्यांना दर आठवड्याला स्वखर्चाने RT-PCR चाचणी करुन घेणे बंधनकारक केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
देशातला करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परंतु अमियाक्रोनने या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. मात्र लसीकरणाचं महत्त्व कमी होणार नाही. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या तसंच इतरांच्याही सुरक्षिततेसाठी लस घेणं आवश्यक आहे. सरकारकडून लस घेण्याचं आवाहन केलं जात्वआहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी असाच एक उपाय करण्याचं योजिलं आहे. ज्या नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे, त्या करोना रुग्णांवरच आता केरळ सरकार मोफत उपचार करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App