विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात कोरोनाचा वेग आता थांबला आहे. जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या केवळ ०.७ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेगाने लसीकरण सुरू आहे. देशभरात १८० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.Only 0.7 per cent corona patients in India compared to the rest of the world.
शनिवारी भारताने लसीकरणात एक मैलाचा दगड गाठला. देशात आतापर्यंत १८० कोटी लसीकरण डोस देण्यात आले. भारतातही कोरोनाचा वेग कमी होऊ लागला आहे. गेल्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ५,१८५ आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४०,५५९ झाली आहे.
भारतात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसºया लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र, लस उपलब्ध झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या दुर्गम भागातही लस पोहोचविण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App