वैष्णोदेवी मंदिरात आता ऑनलाईन बुकींगच करावे लागणार, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्णय

विशेष प्रतिनिधी

जम्मू : मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर वैष्णोदेवी श्राइन बोडार्ने बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. ऑफलाइन बुकिंगची पद्धत रद्द करण्यात येत आहे.Online booking will now have to be done at Vaishnodevi temple, decision after the incident

वैष्णोदेवीच्या भाविकांना सध्या १३ किलोमीटर ट्रेकिंगसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बुकिंग केले जाऊ शकते. मात्र कटरा येथे पोहोचल्यावर मोठ्या संख्येने लोक ऑफलाइन स्लिप घेत असत. कटरा येथे पोहोचल्यानंतर दररोज सरासरी २८,००० लोक बुकिंग करतात. ऑनलाइन बुकिंगची सुविधा फक्त दोन हजार लोकांनी वापरल्याचे समोर आले आहे.



जम्मू-काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्राइन बोर्डाच्या बैठकीत आता ऑनलाईन बुकींगची पध्दत अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे. बोडार्ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की गर्दीचे व्यवस्थापन होईल, रचनेवर फारसा ताण पडणार नाही अशा पध्दती अवलंबण्यात येणार आहेत.

यापैकी एक पायरी म्हणजे ऑनलाइन तिकीट बुक करणे, ट्रॅकवरील गर्दी कमी करणे आणि प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग पूर्णपणे वेगळे करणे. चेंगराचेंगरीनंतर भाविकांनी श्राइन बोर्डावर टीका करत एका दिवसात २५ हजारांपेक्षा जास्त भाविकांना परवानगी देऊ नये, असे म्हटले होते.

Online booking will now have to be done at Vaishnodevi temple, decision after the incident

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात