योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन घुसला एक जण, चार पोलीस निलंबित


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एक कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन एक जण घसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सुरक्षेत ढिसाळपणामुळे चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.One man entered Yogi Adityanath’s program with a revolver, four policemen suspended

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ येत असताना त्यांच्या येण्याच्या काही वेळ आधीच एक इसम रिव्हॉल्व्हर घेऊन सभागृहात शिरला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात चक्क ४ पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.



बस्ती जिल्ह्यातील अटल बिहारी वाजपेयी ऑडिटोरियममध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ स्वत: उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचं आगमन होण्याच्या अवघ्या ४० ते ४५ मिनिटे आधी, सभागृहात एकच खळबळ उडाली. सभागृहात एक व्यक्ती रिवॉल्व्हर घेऊन शिरल्याचं वृत्त सगळीकडे पसरले.

या व्यक्तीचं नाव जितेंद्र पांडे असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जतशंकर शुक्ला आणि त्याचा नातेवाईक जितेंद्र पांडे आणि त्याचा भाऊ अमरदीप हे तिघे कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. मात्र, जितेंद्र पांडेनं सभागृहात येताना सोबत रिवॉल्व्हर आणलं होतं. रिवॉल्व्हरचा परवाना देखील त्याच्यानावे होता. मात्र, पोलिसांना समजताच जितेंद्र पांडेला तातडीने सभागृहाबाहेर काढण्यात आले.

खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमाच्या अवघ्या ४५ मिनिटे आधी सभागृहात रिवॉल्व्हर घेऊन एखादी व्यक्ती प्रवेश करत असल्यामुळे पोलीस यंत्रणेचं हे मोठं अपयश मानलं गेलं. त्यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने तातडीने संबंधित चार पोलिसांना निलंबित केलं आहे. याशिवाय, या प्रकारामध्ये अजून तीन पोलीस कर्मचारी दोषी आढळले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ही व्यक्ती नेमकी कोणत्या उद्देशाने सभागृहात आली होती आणि त्याने सोबत रिवॉल्व्हर का आणलं होतं, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नसून त्यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.

One man entered Yogi Adityanath’s program with a revolver, four policemen suspended

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात