वृत्तसंस्था
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ऑक्सिजन भरत असताना सिलेंडरच्या स्फोटात एकजण ठार झाला असून दोन जण शुक्रवारी (ता. 30) गंभीर जखमी झालेOne killed in explosion of oxygen cylinder;Incidents in the city of Kanpur in Uttar Pradesh
देशात ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला असला तरी ऑक्सिजन सिलेंडर स्फोट होऊन मृत्यू होण्याची ही पहिली घटना असावी. या पूर्वी टँकरद्वारे ऑक्सिजन भरताना किंवा ऑक्सिजन पूरवठ्यात खंड झाल्याने रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पण कानपूर शहरातील पंखी ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन भरताना सिलेंडर स्फोटाची ही घटना घडली. स्फोटात एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमी असलेल्या दोघांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App