Corona Vaccination : एक कोटी नागरिकांचे रोज लसीकरण करणार ; केंद्र सरकारचा कोरोनाला हरविण्याचा निर्धार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि समूळ उच्चाटण करण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी मार्ग आहे. त्या पार्श्व भूमीवर केंद्र सरकारने आगामी काही महिन्यांत दररोज 1 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. One crore citizens will be vaccinated daily; Central government’s decision to defeat Corona

आगामी महिन्यांमध्ये सरकारला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 25 कोटी डोस मिळणार आहेत. स्पुटनिक व्ही आणि इतर व्हॅक्सिनकडेही सरकारचे लक्ष आहे. त्या प्राप्त झाल्या तर लसीकरणात अडचण येणार नाही.



जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून ते शक्य होणार आहे. ही योजना राबविण्यासाठी सरकार महिन्याला 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष देत आहे.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज किमान 100 ते 150 जणांना लस द्यावी, अशी योजना आखली जात आहे.

दोन लसींचे मिश्रण ठरणार प्रभावी

भारतीय शास्त्रज्ञ दोन वेगवेगळ्या लसीच्या मिश्रणातून कोरोनाला मात देता येते का ? याचा अभ्यास करत आहेत. भारतात चाचणी होणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर लोकांना दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी दिल्या जाऊ शकतील.

सिंगल डोस व्हॅक्सिनच विचार सुरू

आगामी काळात कोविशिल्ड लसीचा एकच डोस (सिंगल डोस) देण्याचा विचार केला जात आहे. ही लस कोरोनाशी लढण्यात प्रभावी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक लाइट आणि कोविशिल्ड एकाच पद्धतीनं तयार झाल्या आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन आणि स्पुटनिक लाइट सिंगल डोस व्हॅक्सिनच आहेत.

One crore citizens will be vaccinated daily; Central government’s decision to defeat Corona

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात