दिल्लीतील निजामुद्दीन ते टिळक ब्रिज दरम्यान घडली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणाच्या पलवल येथून नवी दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन रविवारी रुळावरून घसरली. या घटनेत सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नसल्याची माहिती आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील निजामुद्दीन ते टिळक ब्रिज दरम्यान घडली. या घटनेत पॅसेंजर ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला होता. One coach of a local EMU train derailed near Delhis Bhairon Marg
रेल्वेने सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. टिळक पुलावरून ट्रेन नवी दिल्ली स्टेशनला जात होती. रेल्वेचा डबा रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, रेल्वे अधिकारी सध्या कारण शोधत आहेत.
डाऊन मेन लाईनवर हा अपघात झाला. या मार्गावर दुसऱ्या मेन लाइन आणि ईएमयू मार्गावरून गाड्या सुरू राहतील. या घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App