पंतप्रधान मोदींनी 14 ऑगस्ट जाहीर केला फाळणी अत्याचार स्मरण दिवस; भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सैन्यदलाला वाटली निर्मिती दिनाची मिठाई!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एकीकडे भारतीय पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षात प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीबद्दल अधिकृत ट्विटर हँडल भरून दुःख व्यक्त केले आहे. 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार दिन मस्मरण दिन म्हणून भारतात पाळण्यात येईल असे जाहीर केले आहे तर दुसरीकडे भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सैन्य दलाला पाकिस्तान निर्मितीबद्दल मिठाई वाटली आहे. On the occasion of Pakistan’s Independence Day, the Indian Army exchanged sweets with Pakistan Army in Poonch & Mendhar: 16 Corps, Indian Army

पंजाबमधील अटारी आणि हुसैनीवाला बॉर्डरवर मिठाई वाटप करण्यात आलेच. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील तंगधार तसेच पूंच सेक्टरमधील सीमेवर भारतीय सैन्यदलाच्या कमांडर्सनी पाकिस्तानी सैन्यदलाच्या कमांडर्सना मिठाई वाटली.

गेल्या 75 वर्षांमध्ये 14 ऑगस्ट हा पाकिस्तान निर्मिती दिवस तर 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन अशा स्वरूपात सरकारी पातळीवर साजरा करण्यात येतो. भारतीय पंतप्रधान पाकिस्तानच्या नेत्यांना त्यांच्या देशाच्या निर्मितीबद्दल अधिकृत शुभेच्छा देतात. सीमांवर मिठाई वाटप होते.

परंतु यंदा प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट या पाकिस्तान निर्मितीच्या दिवशी फाळणी आणि त्यावेळी झालेल्या अत्याचारांचे स्मरण केले. लोकांना भोगायला लागलेल्या सर्व दुःखाचे आणि त्या वेळी लोकांनी केलेल्या त्यागाचे वर्णन ट्विटरवर केले. 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मरण दिन म्हणून पाळला जाईल असे जाहीर केले. अशावेळी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी सैन्य दलाला मिठाई वाटणे ही सरकारी धोरणातील विसंगती आज दिसून आली.

On the occasion of Pakistan’s Independence Day, the Indian Army exchanged sweets with Pakistan Army in Poonch & Mendhar: 16 Corps, Indian Army

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात