घटनास्थळी अजूनही अनेक जिवंत बॉम्ब पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. On the day of polling in Bengal half of the elections were marked by bomb blasts and subsequent violence TMCs name is in the lead
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी शुक्रवारी (३१ मे २०२४) एक मोठी घटना समोर आली आहे. दक्षिण चोवीस परगण्यातील भांगर भागात बॉम्ब फेकल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदानापूर्वी शनिवारी सकाळी भांगारमध्ये हिंसाचार झाला.
जादवपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत भांगरच्या सतुलिया भागात झालेल्या या संघर्षात सुमारे 10 ISF आणि TMC कार्यकर्ते जखमी झाले आहेत. ISF आणि CPIM कार्यकर्त्यांनी TMC वर या हल्ल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी अजूनही अनेक जिवंत बॉम्ब पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री टीएमसीचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारानंतर घरी परतत असताना हा गोंधळ सुरू झाला. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. जखमींना कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला केला. हा वाद इथेच थांबला नाही. शनिवारी मतदानाच्या दिवशीही दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याने हाणामारी झाली.
जादवपूर ही पश्चिम बंगालमधील सर्वात हायप्रोफाईल लोकसभा जागांपैकी एक आहे. माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि माजी गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांसारखे बलाढ्य डावे नेते या जागेवरून खासदार राहिले आहेत. पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनीही आपल्या संसदीय कारकिर्दीला याच जागेवरून सुरुवात केली. 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ममतांनी या जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर ज्येष्ठ डावे नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App