एकीकडे INDI आघाडी जिंकली, तर पंतप्रधान निवडायला 48 तास लावणार; दुसरीकडे मोदींच्या शपथविधीसाठी भव्य जागेचा शोध!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतल्या शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरू असताना प्रसार माध्यमांची एक्झिट पोलच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. त्या एक्झिट पोल डिबेटवर काँग्रेसने बहिष्कार घातला आहे, पण प्रत्यक्ष निकालामध्ये काँग्रेस प्रणित INDI आघाडी जिंकली, तर आघाडीचे नेते बैठक घेऊन 48 तासांमध्ये पंतप्रधान पदासाठी नेता निवडतील, असे काँग्रेसने जाहीर केले आहे. म्हणजे जिंकल्यानंतरही INDI आघाडीचे नेते पंतप्रधान निवडायला 48 तास लावणार आहेत.BJP in search of new big places for Modi swearing in ceremony



या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते ठरलेलेच असल्याने नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी भव्य जागेचा शोध सुरू आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी परंपरेनुसार राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये किंवा प्रांगणात न घेता, तो अन्य ठिकाणच्या अधिक भव्य जागेवर घ्यावा, यासाठी भाजपमध्ये विचार मंथन सुरू असल्याची बातमी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पहिल्या दोन टर्मचे शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाले होते. त्यापैकी 2014 च्या शपथविधीच्या वेळी मोदींनी “सार्क” देशाच्या प्रमुखांना बोलाविले होते, तर 2019 च्या शपथविधीच्या वेळी “बिमस्टेक” संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांना बोलाविले होते. 2024 च्या शपथविधीसाठी “जी 20” चे पाहुणे येणार असल्याच्या अटकळी बांधल्या गेल्या आहेत.

त्यामुळे राष्ट्रपती भवनाचे प्रांगण कदाचित शपथविधीच्या भव्य समारंभासाठी पुरणार नाही, असे गृहीत धरून अन्य भव्य जागांचा शोध सुरू आहे. यामध्ये “भारत मंडपम” रामलीला मैदान किंवा सेंट्रल व्हिस्टाचा महत्त्वपूर्ण भाग असलेला कर्तव्य पथ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नवीन संसद भवन देखील एक पर्यायी जागा असल्याचे बोलले जात आहे. या चार पैकी एका ठिकाणी मोदींच्या शपथविधीची व्यवस्था करण्यात येईल, असे भाजपच्या गोटातल्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्या सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

पण एकीकडे INDI आघाडी जिंकली, तर त्यांचे नेते स्वतःच्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा नेता निवडण्यासाठी 48 तास लावणार आहेत, तर दुसरीकडे मोदींच्या शपथविधीसाठी जास्तीत जास्त भव्य जागेचा शोध सुरू आहे. या दोन राजकीय घटनांमधील विसंगती “उघड” आहे!!

BJP in search of new big places for Modi swearing in ceremony

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात