विशेष प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दूरदृष्टीतून मांडलेल्या विचारांची प्रचिती गेल्या काही वर्षात आली आहे. अफगाणिस्तान तालिबान्यांनी बळकावल्याची घटना असो वा रशियाने युक्रेनवर नुकताच केलेला हल्ला असो. या दोन्ही घटना पाहिल्या तर ”आज नाही तर आणखी अनेक वर्षे शस्त्रबळ ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत दाखवू शकत नाही.” हे सावरकर यांचे विचार आजच्या घडीला तंतोतंत खरे ठरत आहेत. On the basis of weapons and modern science Nation building is important; Swatantryaveer Savarkar’s thoughts are still inspiring today
सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. सावरकरांचे राष्ट्रवादी विचार आजही प्रेरक असेच आहेत, हे वरील दोन उदाहरणावरून स्पष्ट होते. धर्म,जात, रूढी, जुन्या परंपराचा त्याग करून भारताने विज्ञानाची कास धरावी आणि प्रगती करावी, हा त्यांचा विचार आजही प्रेरक आहे. भारत हे पूर्वीपासून हिंदुराष्ट्र होते आणि भविष्यातही राहील, असे त्यांचे भाकीतही खरे ठरत चालले आहे. हिंदुत्वाच्या पायावर राष्ट्र निर्मिती व्हावी, हा त्यांचा आग्रह होता. जोपर्यंत अन्य धर्म आपला धर्मांधपणा सोडत नाहीत तोपर्यंत हिंदूंनीही आपल्या धर्मासाठी आग्रही राहावे,हा त्यांचा विचार आजही उपयोगी आहे.
कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्यावरून वाद निर्माण केला. शाळेत गणवेश सक्तीचा असताना आम्ही मुस्लिम आम्ही आमच्या धर्माचे पालन करण्यासाठी हिजाब घालणार हा आग्रह चुकीचा होता. आम्ही प्रथम भारतीय आहोत, अशी शिकवण शाळेत दिली जात असताना स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचे प्रयोजन कशासाठी ? मुस्लिम देशाचे नागरिक आहेत. त्यांना धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. परंतु, शाळकरी मुलींमध्ये हिजाबच्या माध्यमातून भेदाभेद करण्याचे कारणच काय? गणवेश हा शाळेचा नियम आहे. तो सर्वांनी पाळलाच पाहिजे. जगातील कोणत्याही न्यायालयात हा नियम पाळावाच लागेल, असा निकाल दिला जाईल. कारण शाळेत कोणत्याही धर्म वैशिष्टयाला स्थान नाही.
तुर्कस्तानच्या कमाल पाशा यांचा आदर्श ठेऊन देशातील मुस्लिमांनी वाटचाल केली तर त्यामध्ये हिंदूंचे कल्याण असून मुस्लिमांचे त्याहून अधिक कोटकल्याण होईल, असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे. कमाल पाशा यांनी मुस्लिम धर्मातील जुन्या चालीरीतीना फाटा दिला आणि तुर्कस्तान हे आधुनिक विज्ञानाच्या पायावर उभे केले. त्यांचा आदर्श मुस्लिमांनी घ्यावा. पण, भारतात नेमके उलटे होत आहे. मुस्लिम मंडळी हिजाब, बुरखा यासारख्या चालीरीतीत अडकून पडत आहेत. त्यांनी तालिबानी वृत्ती सोडून देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची गरज आहे. मुस्लिमांचा वापर केवळ मते मिळविण्यासाठी केला जातो आहे. त्याला काही सत्तापिपासू मंडळींकडून खतपाणी घातले जात आहे.
काही विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ हिंदू नेत्यांची लाकडे स्मशानात गेली असताना ते हिंदूविरोधी कारवायात गुंतले आहेत. तुम्ही गेल्यावर तुमच्या पश्चात हिंदू धर्माचे भवितव्य काय ? याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाही. जगभरात नजर टाकली तर अर्धीअधिक पृथ्वी आधीच मुस्लिम आणि ख्रिश्चन यांनी बळकावली आहे. जो हिंदुस्थान राहिला आहे. तेवढा भूभाग तरी हिंदूंच्या वाट्याला रहावा एवढे कर्म करा म्हणजे झाले. मुस्लिम आणि ख्रिश्चनांना त्यांचे देश आहेत. पण, हिंदूंचे काय होणार? याचा विचार तुम्ही केला आहे का ? एकंदरीत हिंदूंनी आपल्या राष्ट्राची प्रगती आणि हिंदुराष्ट्र टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App