जो दारूबंदी विरोधात लढला, त्यानेच दारू धोरण बनविले म्हणून अटक; अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल माझ्याबरोबर दारूबंदी लढत होते पण त्यांनीच मुख्यमंत्री झाल्यावर दारू धोरण ठरवले त्यांच्या करणी मुळेच त्यांना अटक झाली आता यापुढे जे काय व्हायचे ते कायद्यानेच होईल, अशी परखड प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. On ED arresting Delhi CM Arvind Kejriwal, Social activist Anna Hazare

अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर अण्णा हजारे यांना जागे करा, असा टोमणा सकाळी संजय राऊत यांनी हाणला होता. त्यामुळे अण्णा खरंच जागे झाले आणि त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचे समर्थन केले.

अण्णा हजारे म्हणाले अरविंद केजरीवाल माझ्याबरोबर दारूबंदी विरोधी लढ्यात काम करत होते, पण नंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःच राज्याचे दारू धोरण ठरविले, याचे मला फार वाईट वाटले. आता त्यांना जी अटक झाली आहे, ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झाली आहे. ती केजरीवालांना त्यांच्या करणी मुळेच अटक झाली आहे. त्यामुळे इथून पुढे जे काही व्हायचे, ते कायद्याच्याच पातळीवर होईल आणि सरकार त्याचा विचार करेल, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेचे समर्थन केले.

On ED arresting Delhi CM Arvind Kejriwal, Social activist Anna Hazare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात