Delhi results : केजरीवालांच्या सत्तेची झाली सफाई; खुश झाला गांधी परिवाराचा जावई!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती शून्य भोपळा आला, तरी काँग्रेसला फारसा काही फरक पडलेला दिसला नाही. त्याउलट केजरीवालांच्या सत्तेची झाली सफाई आणि खुश झाला गांधी परिवाराचा जावई!! असे चित्र आज समोर आले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का बसला. दिल्लीच्या सत्तेची हॅट्रिक तर हुकलीच पण 20 – 22 जागांवर सिमटण्याची वेळ आम आदमी पार्टीवर आली. त्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला. अरविंद केजरीवाल पराभवाच्या उंबरठ्यावर उभे राहिले. या पार्श्वभूमीवर गांधी परिवाराचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला.

2012 – 13 मध्ये केजरीवाल यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडून आपला राजकीय बेस तयार केला होता. तो आज उद्ध्वस्त झाल्याने रॉबर्ट वाड्रा खुश झाले. त्यांनी पत्रकारांशी बोलताना तो सगळा इतिहास उगाळला. केजरीवाल यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले होते. हरियाणा देखील आपल्यावर असेच खोटे आरोप लागले होते. पण माझा बिझनेस पारदर्शक होता. त्यामुळे हरियाणातल्या मनोहर लाल खट्टर यांच्या भाजप सरकारने मला क्लीन चीट दिली. त्यावर देखील केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

परंतु केजरीवाल नेहमीच माझ्याविरुद्ध प्रकार परिषदेत ए फोरचा कागज फडकावून बोलायचे‌. पण त्यांना माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दिल्लीतल्या जनतेने आज त्यांच्या आम आदमी पार्टीला नाकारले. कारण त्यांनी अण्णा हजारे यांना देखील सोडून दिले होते. अण्णांच्या आंदोलनाचा लाभ घेऊन केजरीवाल दिल्लीत सत्तेवर आले, पण त्यांनी परफॉर्मन्स दाखवला नाही म्हणून दिल्लीतल्या जनतेने त्यांना नाकारले, असा टोला रॉबर्ट वाड्रा यांनी हाणला.

दिल्लीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या प्रचाराचा दिल्लीकरांवर काहीही प्रभाव पडला नाही. मात्र याबद्दल रॉबर्ट वाड्रा यांनी चकार शब्द उच्चारला नाही. ते फक्त अरविंद केजरीवाल यांच्या पराभवावर खुश झालेले दिसले.

On Delhi elections, businessman Robert Vadra says

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात