Omar abdullah : जम्मू काश्मीर मध्ये सत्तेवर येण्याच्या अब्दुल्लांच्या गर्जना; 370 कलम पुन्हा आणायच्याही वल्गना !!

Omar abdullah

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच उत्साहाचे उधाण आलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याच्या गर्जना तर केल्याच, पण सत्तेवर येताच कोणत्या विकासाच्या योजना आणणार हे सांगण्यापेक्षा रद्द झालेले 370 कलम पुन्हा आणायच्या वल्गना मात्र करून घेतल्या. Omar abdullah says jammu and kashmir

निवडणुकांची घोषणा होताच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कलम 370 वर मोठे वक्तव्य केले. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला, त्याविरोधात नव्या विधानसभेत ठराव करू, असे अब्दुल्ला म्हणाले.

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत याबाबतचे विधेयक मांडून कलम 370 रद्द केले होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राज्याचा विशेष दर्जा काढून घेणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणे हे विधानसभेतील पहिले काम असेल. विधानसभा गठीत झाल्यानंतर आमच्यासमोरचा हा पहिला कार्यक्रम असेल.


Indian Army : भारतीय लष्कराने इतिहास रचला, 15 हजार फूट उंचीवर जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल बनवले


विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच दुसऱ्या दिवशी ओमर अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले. निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानुसार १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत जम्मू आणि काश्मीरच्या ९० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

जम्मू आणि काश्मीरमधील विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अबाधित राखल्यानंतर महिन्याभरात केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात येत आहेत. २०१४ साली नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर १९ डिसेंबर २०१८ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

ओमर निवडणुकीपासून दूर राहणार

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचीही घोषणा ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. त्यांचे वडील आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला हे आगामी निवडणुकीत पक्षाचा कारभार पाहणार आहेत. “मी देवाचे आभार मानतो की, अखेर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. तारखांबाबत जरा गोंधळ होता, पण अखेर आता निवडणुका होत आहेत, अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

Omar abdullah says jammu and kashmir will pass resolution against ending article 370 after assembly polls

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात