विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल कॉँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातील ज्येष्ठ कंटाळले आहेत. त्यामुळे पक्षात तरुण तुर्क विरुध्द म्हातारे अर्क असा संघर्ष सुरू आहे. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या ओंजळीने अभिषेक बॅनर्जी पाणी पित आहेत, असा आरोप करत त्यांच्या अव्यवहार्य सल्यांना आता पक्षाचे ज्येष्ठ नेते कंटाळले आहेत.Older leaders fed up with young Turks in Trinamool Congress, senior leaders conflict with Mamata’s nephew
तृणमूलचे अनेक ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी व प्रशांत किशोर यांच्याकडून पक्षात सुरू असलेल्या तथाकथित सुधारणांना विरोध करीत आहेत. एक व्यक्ती एक पद, गुन्हेगारांना निवडणुकीपासून दूर ठेवणे, ६० वर्षांवरील लोकांना निवडणूक लढण्यापासून दूर ठेवणे व दलबदलूंच्या पक्षात प्रवेश देण्यावर बंदी घालावे असे काही नियम प्रस्तावित आहेत.
या माध्यमातून अभिषेक बॅनर्जी आपल्याला मानणाऱ्या नेत्यांची फळी तयार करत असल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे. मात्र, हुकूमशाही पध्दतीने चालविल्या जाणाऱ्या तृणमूलमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना ते थेट विरोध करण्याची ताकद कोणातही नाही.
त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून अभिषषक यांच्यावर निशाणा साधला जात आहे. याला कंटाळून प्रशांत किशोर यांनी तृणमूलची वेबसाईट व सोशल मीडिया हँडलपासून स्वत:ला वेगळे केले. मात्र, तृणमूलशी त्यांच्या कंपनीचा करा २०२६ पर्यंत आहे.
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुकीसाठी अभिषेक यांनी सुधारणांना अनुसरून उमेदवारांची एक यादी पक्षाच्या वेबसाईटवर टाकली. ममता बॅनर्जी गोव्यातील निवडणूक प्रचारानंतर परतल्यावर ज्येष्ठ नेत्यांच्या दबावाखाली त्यांना अन्य एक यादी दिली.
यामुळे अभिषेक, प्रशांत यांच्याबरोबरच मदन मित्रा, चंद्रिमा भट्टाचार्य यासारखे त्यांचे समर्थक नाराज आहेत. सरचिटणीस सुब्रत बख्शी, पार्थ चटर्जी, फिरहाद हाकीम व मुकुल रॉय यासारखे ज्येष्ठ नेते अभिषेक यांच्याऐवजी ते प्रशांत किशोर यांच्यावर टीका करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App