विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाले आहे त्याचा एक सुनिश्चित कायदेशीर कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पूर्वी 5 राज्यांच्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका पार पडले आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी आता एक “पॉलिटिकल कम्फर्ट झोन” तयार झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी प्रचलित नावांपेक्षा वेगळे नाव पुढे आणून राजकीय वर्तुळात बरोबरच देशाला नवे सरप्राईज देऊ शकतात. Old names in the race or Prime Minister Modi’s surprise beyond that
तसाही 2022 – 23 चा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच 5 राज्यांच्या निवडणुकांची चर्चा सुरु झाली होती त्याच बरोबर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचीही चर्चा सुरू झाली होती. प्रसार माध्यमांनी एकापासून देखील नावे चर्चेत आणली होती.
यामध्ये सध्याचे महामहिम रामनाथ कोविंद यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने नवे नाव कोणते असेल, याबाबत विविध मतप्रवाह आहेत. त्यापैकी काही प्रमुख नावांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छत्तीसगढच्या राज्यपाल अनुस्युया उईके, केरळचे राज्यपाल अरीफ महंमद खान, उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू किंवा लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्याबद्दल सर्वाधिक चर्चा आहे.
मात्र, सर्वांनाच धक्का देत नवे सरप्राईज देणे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता खेळ असल्याने त्यांच्या पोतडीतून ऐनवेळी कोणाचे नाव निघेल, याबद्दल सगळेच जण अंधारात चाचपडत आहेत. अशा अनपेक्षित नावांमध्ये कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, नागालँडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एस. सी. जमीर, भाजपचे ज्येष्ठ नेते- माजी राज्यपाल राम नाईक, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि अगदी राजनाथसिंह यांच्या देखील नावाची कुजबूज आहे.
यापैकी प्रमुख नावे अशी :
– १. अनुस्यूया उईके (मध्य प्रदेश)
सध्या छत्तीसगढच्या राज्यपाल भाजपचा आदिवासी चेहरा. दोनदा खासदार मूळच्या काँग्रेसवासी. मध्य प्रदेशात मंत्रीदेखील होत्या नव्वदच्या दशकात भाजपमध्ये पेशाने अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका धर्मांतराच्या मुद्द्यावरून संघ परिवाराचा विरोध शक्य
– २. डाॅ. अरीफ महंमद खान (मध्य प्रदेश / उत्तर प्रदेश)
सध्या केरळचे राज्यपाल इस्लामचे विद्वान, सुधारणावादी अभ्यासू चेहरा शाहबानोप्रकरणी राजीव गांधींच्याविरोधात राजीनामा देणारे पाचवेळा खासदार, दोनदा केंद्रीय मंत्री ‘सब का विश्वास’साठी उपयुक्त चेहरा
– ३. व्यंकैय्या नायडू (आंध्र प्रदेश)
सध्या उपराष्ट्रपती भाजपचा दिग्गज नेता माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री भाजपचा दक्षिणेतला चेहरा
– ४. सुमित्रा महाजन (मध्य प्रदेश)
लोकसभेच्या माजी सभापती इंदूरमधून तब्बल ९ वेळा लोकसभेवर. माजी केंद्रीय मंत्री मूळच्या महाराष्ट्रीयन. चिपळूणच्या संघ परिवारामध्ये मानाचे स्थान
5. थावरचंद गेहलोत
सध्या कर्नाटकचे राज्यपाल. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पासून केंद्रीय राजकारणात वावर. राजस्थानातल्या दलित समाजातले मोठे नाव. भाजपचे जुने निष्ठावंत नेते. पंतप्रधान मोदींचे विश्वासपात्र.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App