वृत्तसंस्था
भुवनेश्वर : केंद्रातले मोदी सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआय, एनआयए यांच्यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप I.N.D.I आघाडीतले घटक पक्ष करत असले, तरी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मात्र मोदी सरकारची स्तुतीच केली आहे. Odisha CM Naveen Patnaik praises PM Modi: Rates him 8/10, commends Centre’s foreign policy
देशातला भ्रष्टाचार निपटण्यात आणि देशाचे कठोर परराष्ट्र धोरण राबविण्यात मोदी सरकारला मी 10 पैकी 8 गुण मी देईन, अशा स्पष्ट शब्दांमध्ये नवीन पटनाईक यांनी मोदी मोदी सरकारला शाबासकी दिली आहे. केंद्रातले सरकार भ्रष्ट नाहीच. पण देशातला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सरकार ज्या उपाययोजना करत आहे, त्या परिणामकारक आहेत. त्यासाठी मी त्यांना 10 पैकी 8 गुण देईल, असे नवीन पटनाईक एका कार्यक्रमात म्हणाले. केंद्र सरकारचे सरकारशी ओडिशा सरकारचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध आहेत. कारण आम्हाला राज्याचा विकास हवा आहे आणि राज्याच्या विकासात केंद्र आणि राज्य सरकार यांचे सहकार्य मोलाचे ठरते, अशी पुस्तीही नवीन पटनायक यांनी जोडली
नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने केंद्रातल्या सर्व महत्त्वाच्या विधेयकांना लोकसभा आणि राज्यसभेत पाठिंबा दिला होता. यात जीएसटी पासून ते महिला आरक्षणापर्यंत अनेक विधेयकांचा समावेश आहे. पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, बिहार यांच्यासारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींची उभा दावा आहे. तसे मोदी आणि नवीन पटनाईक यांच्यात संबंध कधीच नव्हते. दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच मैत्री संबंध राहिले आहेत.
पण मोदी सरकारवर I.N.D.I आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते नेहमीच ईडी, सीबीआय, एनआयए सारख्या तपास संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप करतात, या पार्श्वभूमीवर नवीन पटनाईक यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला भ्रष्टाचार निपटण्याच्या कार्यक्रमासाठी उपाययोजनासाठी 10 पैकी 8 देणे याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App