नितीश – लालूंच्या राजवटीत बिहारमध्ये महादलित महिलेला निर्वस्त्र करून मारहाण; तोंडावर लघवीचा अश्लाघ्य प्रकार!!


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये ओबीसी दलितांचे तारणहार बनून राज्य करत असलेल्या नितीश कुमार आणि लालूप्रसादांच्या राजवटीत महादलित महिलेवर भीषण अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या 1500 रुपये कर्जावरचे व्याज दिले नाही, असा आरोप लादत प्रमोद सिंह आणि अंशू सिंह या पिता – पुत्रांनी एका महादलित महिलेला निर्वस्त्र केले. तिला बेदम मारहाण केली आणि अंशू सिंह याने त्या महिलेच्या तोंडावर लघवी केली. पाटण्याजवळच्या ग्रामीण भागात मोशिमपूर गावात ही घटना घडली. Bihar Mahadalit woman assaulted, stripped & urinated upon for not paying loan interest

संबंधित महिलेने या पिता पुत्रांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले आणि तिने तक्रार दाखल केली. संबंधित महिलेने प्रमोद सिंह यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी 1500 रुपये कर्ज घेतले होते. त्याच्यावरचे व्याज आणि ते 1500 रुपये तिने चुकते देखील केले होते. परंतु प्रमोद सिंह जास्त व्याज मागत होता. यासाठी तिला अनेक वेळा त्याने धमक्या देखील दिल्या.

याविषयी या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रमोद सिंहला बोलवून चौकशी केली. पण ज्या दिवशी चौकशी केली, त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी प्रमोद सिंह आणि त्याचा मुलगा अंशू सिंह याने संबंधित महिलेचे अपहरण करून घरी आणले. तिला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. त्यानंतर प्रमोद सिंह याने अंशू सिंह गेला या महिलेच्या तोंडावर लघवी करायला सांगितले. हे सर्व कथन महिलेने नंतर पोलीस ठाण्यात करून त्या पिता-पुत्रांविषयी तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच हे दोघेही पिता-पुत्र फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

ओबीसी आणि दलितांचे मसीहा बनून बिहारमध्ये राज्य करीत असलेल्या नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजवटीत महादलित महिलेवर असा अत्याचार झाला आहे. त्याविषयी पोलिसी कारवाई वगळता सरकारने त्या महिलेला दिलासा देण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.

Bihar Mahadalit woman assaulted, stripped & urinated upon for not paying loan interest

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात