वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून साजरा होणार आहे. अमेरिकेतील हिंदू धर्माच्या मोठ्या योगदानाची दखल घेण्याच्या उद्देशाने अनेक राज्यात हा उपक्रम राबविला जात आहे. याबाबतची घोषणाच अमेरिकन सरकारने जाहीर केले. टेक्सास, फ्लोरिडा, न्यू जर्सी,ओहियो आणि मास्साचुसेट्स या राज्यात हिंदू वारसा दिन साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्माच्या अमेरिकेत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल हा निर्णय घेतला आहे. October will be celebrated as Hindu Heritage Month in USA, Notice the contribution of Hindu Religion
हा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये पूर्ण महिनाभर सुरु राहणार आहे. त्यासाठी हिंदुत्ववादी संघट्नाकडून हा एक सणचं म्हणून साजरा होत आहे. विविध राज्यांचे राज्यपाल, काँग्रेस आणि सेनेटर यांच्या कार्यालयातून एक घोषणापत्र जाहीर केले आहे. त्यात म्हंटले आहे की, “श्रद्धेचे समुदाय दीर्घ काळापासून आशेचे दिवे बनले आहेत, त्यांच्या विश्वास आणि सेवेद्वारे अमेरिकेतील समुदाय सुधारत आहेत; जगभरातील हजारो अनुयायांचे जीवन सुधारणे आणि प्रेरणा देण्याचे कार्य हिंदू धर्माने आपल्या अनोख्या इतिहास आणि वारशाद्वारे केले आहे. आपल्या राज्य आणि राष्ट्राला मोठे योगदान दिले आहे. ”
अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटना आता अमेरिकन सरकारने औपचारिकपणे “हिंदू वारसा महिना” घोषित करण्यासाठी मोहीम राबवत आहेत आणि प्रयत्न करत आहेत. राष्ट्रपती जो बायडन यांनी याबाबीला दुजोरा दिला आहे.
संपूर्ण ऑक्टोबरमध्ये साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमात संस्कृतीच्या विविधता पाहता येणार आहे. जगाच्या विविध भागांतील बहु-पिढीतील हिंदू जे अमेरिकेला आपले घर म्हणतात, ते गुण्यागोविंदाने राहतात. ऑक्टोबरमध्ये या महिनाभर चालणाऱ्या उत्सवासाठी भारतीय कला, नृत्य, संगीत, योग, ध्यान, मनन, आयुर्वेद आणि खाद्यपदार्थ यांची रेलचेल असेल.
– शोभा स्वामी,महासचिव, कोलिशन ऑफ हिंदुज ऑफ नॉर्थ अमेरिका
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App