NewsClick हे चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या हातातले भारत विरोधी हत्यार; मोदी विरोधी कॅम्पेन साठी चिनी मनी लॉन्ड्रीग!!; न्यूयॉर्क टाइम्सचीही कबुली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात विशिष्ट अजेंडा डोक्यात ठेवून हेट मोदी कॅम्पेन चालवणारे NewsClick वेब पोर्टल आणि त्याचा मालक नेव्हिल रॉय सिंघम हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPC) हातातले हत्यार आहे. त्याचा धोका केवळ भारतालाच नाही, तर तो अमेरिकेसारख्या लोकशाहीला देखील आहे, अशी कबुली आणि इशारा एरवी मोदी विरोधात असलेल्या न्यूयॉर्क टाइम्सने दिला आहे. NYT probe unearths links between Chinese propaganda in India

NewsClick धोकादायक आणि देशवेधहिता विरोधात असल्याचे भारतीयांना माहिती होतेच पण त्याची कबुली मात्र NewsClick किंवा पाश्चात्य प्रसार माध्यमे देत नव्हती. पण आता जेव्हा अमेरिकेतल्या इकोसिस्टीमला NewsClick आणि नेव्हिल राय सिंघम यांच्यापासून धोका उत्पन्न झाला आहे, त्यावेळी मात्र न्यूयॉर्क टाइम्ससारख्या प्रखर मोदी विरोधी माध्यमांनी देखील NewsClick च्या धोक्याविषयी कबुली देऊन अमेरिका आणि भारताला इशारा दिला आहे.

चीन मधून मनी लॉन्ड्रीग

2018 ते 2021 दरम्यान चिनी कम्युनिस्ट पार्टीने न्यूज क्लिकला 38 कोटी रुपये दिले त्यापैकी 9.59 कोटी रुपये मनी लॉन्ड्रीग द्वारे आले. न्यूज क्लिक कंपनीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आयटी सेलच्या मेंबरला 52 लाख रुपये दिले. या सगळ्या फंडिंग मध्ये नेव्हिल रॉय सिंघम हा पॉईंट मॅन होता. त्याची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी आहे, याचा स्पष्ट खुलासा ईडीच्या चौकशी आणि तपासात झालाच होता. ती केस आजही सुरू आहे .आता फक्त त्याची कबुली न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे, जी आत्तापर्यंत न्यूयॉर्क टाइम्स कधी देत नव्हता.

– या संदर्भात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक सविस्तर ट्विट केले आहे.

– ते ट्विट असे :

अनुराग ठाकूर @ianuragthakur अगदी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सारखी वर्तमानपत्रेही आता हे मान्य करत आहेत, की नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे (CPC) धोकादायक साधन आहे आणि जगभरात चीनच्या राजकीय अजेंडाचा प्रचार करत आहेत.

पण NYT च्या खूप आधी, भारत संपूर्ण जगाला हेच ओरडून सांगतोय की NewsClick हे चिनी प्रचाराचे धोकादायक जागतिक वेब माध्यम आहे. समविचारी शक्तींच्या पाठिंब्याने, नेव्हिल हा संशयास्पद भारतविरोधी अजेंडा पुढे नेत आहे. 2021 मध्ये, जेव्हा भारताच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी मनी लाँड्रिंगच्या भक्कम पुराव्याच्या आधारे NewsClick विरुद्ध चौकशी सुरू केली, तेव्हा काँग्रेस आणि डावी लिबरल यांची सगळी इकोसिस्टम त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आली होती.

काँग्रेसने नेव्हिल आणि न्यूजक्लिकचा बचाव करणे स्वाभाविक आहे कारण त्यांच्या नेतृत्वासाठी राष्ट्रीय हित कधीच महत्त्वाचे नसते. याच काँग्रेस पक्षाने 2008 साली भारतातील चिनी हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी CPC सोबत सामंजस्य करार केला आणि चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशन (RGF) साठी कथितपणे देणग्या स्वीकारल्या आहेत ना!!

“यूपीए” हजार वेळा नाव बदलून “इंडिया” शकते. पण या “घमंडिया” गठबंधनाच्या हातात देश सुरक्षित राहणार नाही याची पक्की जाणीव भारतीय जनतेला आहे!!

NYT probe unearths links between Chinese propaganda in India

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात