‘’ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते भगवान शिवाचे मंदिर आहे’’ बाबा बागेश्वर यांचं विधान!

हरिणातील नूह मधील हिंसाचारावरही दिली आहे प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

छिंदवाडा  : बाबा बागेश्वर सध्या छिंदवाडा येथे कथाकथन करत आहेत. दरम्यान ज्ञानवापी प्रकरणी त्यांनी मोठे वक्तव्य केले असून ज्ञानवापी ही मशीद नाही, ज्ञानवापी हे भगवान शंकराचे मंदिर आहे. तसेच बाबा बागेश्वर नूह हिंसाचारावर म्हणाले की, हे देशाचे दुर्दैव आहे की सनातनी हिंदू हे प्रकार पाहत आहेत आणि हे प्रकार घडत आहेत, म्हणूनच आता झोपेतून जागे व्हा. Stop calling Gyanvapi a mosque it is a temple of Lord Shiva Baba Bageshwars statement

कमलनाथ यांचा बालेकिल्ला छिंदवाडा येथे कमलनाथ आणि नकुल नाथ यांनी आयोजित केलेल्या कथेवर बागेश्वर बाबा म्हणाले, “छिंदवाडा येथे येऊन छान वाटले, आम्ही नेहमीच सर्वत्र फिरतो. सनातन सर्वांचे आहे, आम्ही राजकीय व्यक्ती नाही, आम्हाला यापासून दूरच ठेवले पाहिजे. आम्ही जात प्रथा संपवून सर्वांना एकत्र आणत आहोत. आमच्यासाठी सर्व समान, सर्व जग समान आहे.

मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसने पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग सुरू केला आहे आणि या प्रयोगातूनच मागच्या दारातून हिंदुत्वात प्रवेश करण्याचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी प्रयत्न चालवला आहे. राम कथेच्या निमित्ताने या पिता – पुत्रांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबांचे छिंदवाड्यात जोरदार स्वागत केले आहे. बागेश्वर बाबांचे स्वागत करताना कमलनाथ त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Stop calling Gyanvapi a mosque it is a temple of Lord Shiva Baba Bageshwars statement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात