NSUI : सावरकरांच्या नावाची काँग्रेसला पुन्हा आली ऍलर्जी; त्यांच्या ऐवजी मनमोहन सिंगांचे नाव कॉलेजला देण्याची मागणी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसला पुन्हा एकदा सावरकर नावाची ऍलर्जी आली. काँग्रेसची विद्यार्थी शाखा “एनएसयूआय”ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दिल्लीत सावरकर कॉलेज ऐवजी मनमोहन सिंग कॉलेजची पायाभरणी करावी अशी मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये पूर्व आणि पश्चिम अशी भर पडून त्यामुळे नजफगड येथे वीर सावरकर कॉलेजची पायाभरणी झाली. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेसने कॉलेजच्या नावाबद्दल वाद घालायला सुरुवात करत संबंधित कॉलेजला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याऐवजी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी केली. संबंधित कॉलेजमधून देशाच्या नव्या पिढीला प्रेरणादायी विचार मिळाले पाहिजेत. डॉ. मनमोहन सिंग यांचे देशाविषयीचे योगदान फार मोठे आहे. त्यांचे नाव कॉलेजला देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे पत्र लिहून “एनएसयूआय”ने सावरकरांच्या नावाला विरोध केला.

सावरकरांना “माफीवीर” म्हणून राहुल गांधींनी त्यांचा सातत्याने अपमान केलाच त्याचबरोबर लोकसभेत ते मनुस्मृतीचे समर्थक असल्याचा जावईशोध लावून त्यांच्याविषयी अपप्रचार करणारे भाषण केले त्या पाठोपाठ सावरकरांचे नाव दिल्लीतल्या कॉलेजला द्यायला देखील त्यांच्या काँग्रेसने विरोध केला. मात्र तरीही पंतप्रधान मोदींनी वीर सावरकर कॉलेजचे भूमिपूजन केलेच.

NSUI writes PM Modi demanding to name a college under the University of Delhi after the late former PM Dr Manmohan Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात