Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अधिसूचना जारी

Jammu and Kashmir

उमेदवारी केव्हा आणि कधीपर्यंत दाखल केली जाईल हे जाणून घ्या.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुरुवारी (२९ ऑगस्ट) जम्मू आणि काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचनेनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे, तर छाननी ६ सप्टेंबरला होणार आहे. उमेदवार ९ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात, असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.



जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचारासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत शिवराज चौहान, योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणी यांचीही नावे आहेत.

तर जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने 17 जागांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात पक्षप्रमुख मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांचेही नाव होते. दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मेहबुबा यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. मेहबुबा या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत अनंतनागमधून रिंगणात होत्या, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Notification issued for the second phase of polling in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात