बांगलादेश सरकारने नुकत्याच झालेल्या धार्मिक संघर्षांबद्दल दावा केला आहे की, या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ मुस्लिम आणि २ हिंदू आहेत. अनेक ठिकाणी मृतांचा आकडा फुगवून सांगितला जात आहे, जे चुकीचे आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे की, कोणावरही बलात्कार झाला नाही आणि एकाही मंदिराची नासधूस झाली नाही. मात्र, देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि हिंसाचार झाला आहे, जो दुर्दैवी होता आणि घडायला नको होता. सरकारने तातडीने गुन्हेगारांना अटक केली असून ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. Not a single temple was destroyed says Bangladesh foreign ministry on communal riots
वृत्तसंस्था
ढाका : बांगलादेश सरकारने नुकत्याच झालेल्या धार्मिक संघर्षांबद्दल दावा केला आहे की, या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ मुस्लिम आणि २ हिंदू आहेत. अनेक ठिकाणी मृतांचा आकडा फुगवून सांगितला जात आहे, जे चुकीचे आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे की, कोणावरही बलात्कार झाला नाही आणि एकाही मंदिराची नासधूस झाली नाही. मात्र, देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि हिंसाचार झाला आहे, जो दुर्दैवी होता आणि घडायला नको होता. सरकारने तातडीने गुन्हेगारांना अटक केली असून ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.
परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांवरही प्रश्न उपस्थित केले. शेख हसीना सरकारची मानहानी करण्यासाठी हिंसाचाराच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्याचे ते म्हणाले. दुर्गापूजेच्या वेळी झालेल्या जातीय हिंसाचाराची आम्ही चौकशी करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक अन्याय करणाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
एका व्यक्तीने पवित्र कुराणची प्रत देवतेच्या पायाजवळ सोडली, या घटनेचीही आम्ही चौकशी करत आहोत, ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, देशात हिंदूंवरील हल्ल्यांसंदर्भात किमान 71 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रकरणी सुमारे 450 जणांना अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना हिंसाचार भडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ज्यांनी अलिकडच्या काळात धर्माचा वापर करून हिंसाचाराला चिथावणी दिली होती, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांना केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App