विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : जनता दल (धर्मनिरपेक्ष) भाजपमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी जेडीएसचे सर्वेसर्वा देवेगौडा यांच्या पक्षावर टीका केली. .No surprise if JDS merges with BJP in next few days Siddaramaiah
सिद्धरामय्या म्हणाले की, ”जेडीएसने आपल्या नावातून सेक्युलर हा शब्द काढून टाकावा. हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आपली योजना भाजप कधीही सोडणार नाही आणि देवेगौडा आणि कुटुंबीय त्यांच्यात सामील झाले आहेत.आगामी काळात देशात राजकीय ध्रुवीकरण आणि मतांचे ध्रुवीकरण होणार असून, एका बाजूला जातीयवादी शक्ती आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत.”
सिद्धरामय्या म्हणाले की JD(S) हा राजकीय पक्ष नाही, तर तो देवेगौडा आणि कुटुंबाचा पक्ष आहे. ही एक कौटुंबिक पार्टी आहे. उद्या JD(S) भाजपमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मला वाटते जोपर्यंत देवेगौडा आहेत, तोपर्यंत ते एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून राहतील आणि राजकीय कारणांमुळे विलीनीकरण होणार नाही. परंतु त्यानंतर त्यांचे विलीनीकरण होईल
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App