सन 2002 मध्ये घडलेल्या गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर त्या वेळचे गुजरात विधानसभेचे आमदार अमित शहा यांनी सन 2022 मध्ये आज 25 जून 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री पदावरून मौन सोडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. तब्बल 40 मिनिटांच्या या मुलाखतीत अमित शहा यांनी गुजरात दंगल, त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेले आरोप, स्थानिक कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना मिळालेली क्लिनचीट या सर्व मुद्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. No questions on Thackeray government and Shivsena split!! What is behind amit Shah’s interview politics
– राजकीय इंगित काय??
पण या अख्ख्या मुलाखतीत सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडींवर मुलाखतकार एएनआयच्या संपादिका स्मिता प्रकाश यांनी एकही प्रश्न विचारला नाही आणि अमित शहा यांनी न विचारलेल्या प्रश्नाला चकार शब्दाचेही उत्तर दिले नाही. यातच महाराष्ट्रातल्या घडामोडींचे सगळे राजकीय इंगित दडले आहे.
– दिल्लीतील व्यूहरचना
महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींवर अमित शहा आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिशय बारकाईने लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन सगळी व्यूहरचना करून आले आहेत. तशा बातम्या आहेत पण तरी देखील 40 मिनिटांच्या मुलाखतीत अमित शहा यांना एकही प्रश्न विचारला गेला नाही आणि त्यावर त्यांनी चकार शब्दाचेही उत्तर दिले नाही. यात फार मोठ्या राजकीय अर्थ दडला आहे!!
Interview to ANI. https://t.co/Wxib4Woz8C — Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 25, 2022
Interview to ANI. https://t.co/Wxib4Woz8C
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 25, 2022
– पवारांच्या प्रयत्नात खोडा
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. ठाकरेंचे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात उतरून प्रयत्न करत आहेत. म्हणजे अशा बातम्या आहेत आणि तरी देखील या सर्व घटनाक्रमाचे मूळ सूत्रधार असणाऱ्या नेत्याला म्हणजे अमित शहा यांना 40 मिनिटांच्या मुलाखतीत एकही प्रश्न विचारला जात नाही आणि त्यावर ते चकार शब्दाचेही उत्तर देत नाहीत याचा नेमका अर्थ काय समजायचा?? याचे उत्तर महाराष्ट्रातल्या मिडियाने शोधले पाहिजे.
– लढाई लंबी है
महाराष्ट्रातला मीडिया पवार बुद्धीने महाराष्ट्रातल्या सर्व घटनाक्रमाचे विश्लेषण करताना दिसतो आहे. शिवसेना फुटल्यावर परिणाम काय होतील??, पवार सरकार कसे वाचवतील?? पवारांनी कशी पॉवरफुल खेळी केली?? वगैरे “नॅरेटिव्ह सेटिंग” वर्णने मराठी माध्यमांमधून येत आहेत त्यावर चॅनेली चर्चा झडत आहेत. तरीदेखील अमित शहा मुलाखत देऊनही महाराष्ट्रातल्या घडामोडींवर एक शब्दानेही बोलत नाहीत या विषयी या माध्यमांनी अद्याप खुलासा केला नाही. भाजपने याबाबत खुलासा करण्याचा प्रश्नच दूर आहे. याचा उघड अर्थ असा आहे लढाई लंबी है आगे आगे देखो होता क्या है!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App