एकनाथ शिंदे बंड : ठाकरे – पवार सुरक्षा काढायला गेले; 38 आमदारांच्या सह्यांनिशी फुटीवर शिक्कामोर्तब झाले!!

नाशिक : राजकीय खेळीतले मास्टरस्ट्रोक कधी कधी कसे फेल जातात, याचे उत्तम उदाहरण आज समोर आले आहे. ठाकरे – पवार हे आपले सरकार वाचवण्यासाठी बंडखोर आमदार यांची सुरक्षा काढायला गेले आणि 38 आमदारांच्या सह्यांनिशी शिवसेनेतल्या फुटीवर स्वतःहून शिक्कामोर्तब करून घेते झाले!! Shivsena splits : 38 MLAs of eknath shinde group writes a letter to Uddhav Thackeray about their own and family security

त्याचे असे झाले : अल्पमतातल्या ठाकरे – पवार सरकारने आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचे मनसुबे रचले. त्याचबरोबर त्या आमदारांबरोबर सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाया करण्याचे निर्देश दिले. पण आता याचा उलटाच परिणाम झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांनी आपल्या सह्यांनिशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आमदारांच्या आणि आमदारांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रावर 38 आमदारांची नावे आणि त्यांच्या सह्या स्पष्ट आहेत.

– अधिकृत लेटरहेडवर 38 आमदारांच्या सह्या

आत्तापर्यंत शिवसेनेचे नेमके किती आमदार एकनाथ शिंदे गटात आहेत हे अधिकृतरीत्या कोणत्याही डॉक्युमेंटवर पुढे आले नव्हते. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना पाठविलेल्या शिवसेनेच्या अधिकृत लेटरहेडवरच्या पत्रामध्ये 38 आमदारांच्या नावानिशी सह्या आहेत. एक प्रकारे हे शिवसेनेतल्या दोन तृतीयांश फुटीवर शिक्कामोर्तबच आहे.

– दोन तृतीयांश आमदार फुटले

भले शिवसेनेतली आमदारांची फूट आणि सरकार जाते की राहते याचा अंतिम निर्णय विधानसभेच्या सभागृहात होणार असला तरी आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावर प्रथमच एका अधिकृत पत्रावर 38 आमदारांच्या सह्या एकत्रित आल्या आहेत. शिवसेनेत अधिकृतरित्या फूट पाडण्यासाठी दोन तृतीयांश आमदार फुटणे आवश्यक होते. या आमदारांची ही आवश्यक संख्या 37 आहे. प्रत्यक्षात शिवसेनेतून 38 आमदार फुटल्याचे पत्रावरच्या स्वाक्षऱ्यांमधून दिसून येत आहे.

– फूट गहिरी होणार

आता ठाकरे – पवार सरकार खरंच आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढणार का??, आमदारांच्या कुटुंबियांचीही सुरक्षाव्यवस्था काढणार का?? हे प्रश्न आहेत आणि ठाकरे पवार सरकारने खरंच अशी सुरक्षा व्यवस्था काढली तर 38 आमदारांच्या फुटीवरचे शिक्कामोर्तब अधिक गहिरे होत जाणारे हे मात्र निश्चित दिसत आहे!!

Shivsena splits : 38 MLAs of eknath shinde group writes a letter to Uddhav Thackeray about their own and family security

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात