एकनाथ शिंदेंचे बंड : शिवसैनिकांना दिले आंदोलनाचे काम, पण पक्षप्रमुखांची भूमिकाच दोलायमान!!


एकनाथ शिंदे यांनी जसा बंडाचा झेंडा उभारला आहे, तशी शिवसेनेची आणि विशेषतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रचंड  दोलायमान झालेली दिसली आहे. एकीकडे पक्षप्रमुखांची भूमिका दोलायमान आणि शिवसैनिकांना बाहेर दिले आंदोलनाचे काम अशीच आजची 24 जून 2022 रोजीची स्थिती आहे. Shivsena splits : Uddhav Thackeray confused, Shivsainks Agitation on the streets

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी अतिशय भावनाशील होऊन सायंकाळी फेसबुक लाईव्ह केले. तेव्हा खरेतर ते राजीनामा जाहीर करणार होते पण शरद पवार सुप्रिया सुळे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या फोनमुळे त्यांनी तसे केले नसल्याच्या बातम्या आहेत.

– फेसबुक लाईव्हचे पहिले जाळे

फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकार येते आणि जाते परत येते. पण शिवसैनिक टिकला पाहिजे. शिवसेना टिकली पाहिजे. एकनाथजी आणि सर्व शिवसेना आमदार तुम्ही परत या. मी राजीनामा देतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अशी भूमिका मांडली होती. पण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी टाकलेले राजकीय जाळे ओळखले आणि अवघ्या अर्ध्या तासात मुख्यमंत्र्यांचा तो प्रस्ताव फेटाळला.

– संजय राऊतांनी फेकले दुसरे जाळे

त्यानंतर काल दुपारी संजय राऊत यांनी अचानक पत्रकार परिषदेत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. पण सगळ्या आमदारांनी 24 तासाच्या आत परत यावे, अशी राजकीय भूमिका जाहीर केली. पण हे मी जबाबदारीने बोलतो आहे असे त्यांना जाहीर करावे लागले यातच त्यांचे शिवसेनेतले “खरे महत्त्व” कळून आले!!

– शिंदेंनी दोन्ही जाळी उधळून टाकले

पण एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचा हा डाव देखील उधळून लावल्याचे दिसले. त्यांनी आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा. राजीनामा द्या. काँग्रेस – राष्ट्रवादीशी संबंध तोडा. मगच चर्चा करू, अशी भूमिका घेऊन एक प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेले दुसरे जाळे उद्ध्वस्त करून टाकले.

– हीच ती दोलायमान भूमिका

आता आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या बैठकीत पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह करून आपण मोह सोडला पण जिद्द सोडली नाही, असे जाहीर करत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना दमबाजी करून घेतली. माझे मुख्यमंत्रिपद घालवणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, असे लेबल त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चिकटवले. त्याच वेळी त्यांनी जे गेले ते गेले त्यांना सोडून द्या आणि पुन्हा शिवसेना उभे करा, असे आदेश शिवसैनिकांना दिले. शिवसेना आणि ठाकरे हे नाव वगळून तुम्ही जगून दाखवा, असे आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे गटाला दिले. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आपल्याच पक्षातल्या आणि दोनच दिवसांपूर्वी “परत या, परत या” असे आवाहन केलेल्या आमदारांच्या विरोधात उभे केले. आंदोलनासाठी उभे केले. हीच ती शिवसेनेची आणि शिवसेना पक्षप्रमुख यांची दोलायमान भूमिका आहे.

खुर्चीवरून उतरायचे नाही हेच खरे!!

उद्धव ठाकरेंनी परवा घेतलेली भूमिका काल नव्हती. काल घेतलेली भूमिका आज नव्हती. आणि तरीही शिवसेना पक्षप्रमुखांना बहुमत गमावलेले सरकार चालवायचे आहे किंबहुना त्यांना शरद पवारांनी जे खुर्चीवर बसवले आहे त्या खुर्चीवरून उतरायचे नाही किंवा शरद पवार त्यांना उतरू देत नाहीत.

– पवार सरकार वाचवतात शिवसेना नाही

शरद पवार अतिशय चलाखीने हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, शिवसेना नव्हे. हा मुद्दा येथे अधोरेखित केला पाहिजे. शिवसेनेचे अंतर्गत संघटनात्मक पातळीवर काय व्हायचे ते होवो. सरकार टिकले पाहिजे तरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या शाबूत राहतील हे चाणाक्ष पवारांनी ओळखले आहे आणि त्यातूनच पवार सध्यातरी हे सरकार घालवायला तयार नाहीत आणि म्हणूनच त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मातोश्री गाठली आहे.

– 2 पवार, 1पटेल मातोश्रीवर

या सगळ्या दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना दुबळी झाली आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे!! बाहेर शिवसैनिक आपल्याच आमदारांविरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यांच्या फलकांच्या नावांना काळे फसत आहेत आणि दोलायमान स्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्री बसून शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांबरोबर बैठका करत आहेत. हे 24 जून 2022 रोजीचे सायंकाळचे चित्र आहे!!

Shivsena splits : Uddhav Thackeray confused, Shivsainks Agitation on the streets

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात