रेपो दरात बदल नाही, कर्जदारांना दिलासा; RBI ची मोठी घोषणा!!


वृत्तसंस्था

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी गुरुवारी पतधोरण जाहीर केले. मागील 2 द्वैमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने ‘रेपो दरा’त कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळेच व्यजदारांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्याचा रेपो रेट हा 6.50 % इतका आहे.  No change in repo rate, relief to borrowers; Big announcement from RBI

शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना, घरगुती स्तरावर वाढणारी मागणी, स्त्रोत तसेच सध्याच्या परिस्थितीत असलेल्या सकारात्मक बाबींचा विचार केल्यास भारत हा जागतिक स्तरावर भारत हा जगासाठी नवीन विकासाचं इंजिन बनू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

8,9 आणि 10 ऑगस्ट रोजी मॉनिटरी पॉलिसी किमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये रेपो दरांबद्दल सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर एकमताने असा निर्णय घेण्यात आला आहे की रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर हे 6.5 टक्के राहतील. तसेच सॅण्डींग डिपॉझीट फॅसिलीटी म्हणजेच एसडीएफ रेट हे 6.2 टक्के असतील. मार्जिनल स्टॅण्डींग फॅसेलिटी आणि बँक रेट 7.5 टक्के असतील, असंही आरबीआयचे गव्हर्नर म्हणाले.

एचडीएफसीने वाढवले व्याजदर

दरम्यान, आज आरबीआयचे पतधोरण जाहीर होण्याआधीच म्हणजेच बुधवारी खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने ठराविक कालावधीच्या निधीवर आजधारित कर्ज व्याजदरामध्ये म्हणजेच एमसीएलआरवर 15 पॉईंट्सने (0.15 ने) वाढ केली आहे. ही दरवाढ 7 ऑगस्टपासूनच लागू झाली आहे. यामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांच्या कर्जदरांवरील हफ्ता वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

EMI वर परिणाम करतात

RBI ने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट बँक कर्जावर परिणाम होतो. वास्तविक, रेपो दर हा बँकांना कर्ज देणारा दर आहे. जेव्हा ते कमी होते तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि ते वाढल्यानंतर बँका देखील त्यांचे कर्ज महाग करतात. याचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो आणि कर्जाच्या किंमतीमुळे ईएमआयचा बोजाही वाढतो.

No change in repo rate, relief to borrowers; Big announcement from RBI

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात