जेडीयू नेते केसी त्यागी यांचा मोठा दावा Nitish Kumar was offered the post of Prime Minister by the Indian Alliance
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीदरम्यान जेडीयू नेते केसी त्यागी यांनी वक्तव्य करून राजकारण तापवले आहे. केसी त्यागी यांनी दावा केला आहे की नितीश कुमार यांना काँग्रेस आणि इंडि आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी हे पद स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला.
ते म्हणाले की, इंडि आघाडीचे नेते ज्यांनी नितीश कुमार यांना राष्ट्रीय संयोजक बनवण्यास एकेकाळी स्पष्टपणे नकार दिला होता, ते आज त्यांना पंतप्रधान बनवण्याची ऑफर देत आहेत, परंतु नितीश कुमार यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यांनी भाजप-एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होणार आहे. विरोधकांसाठी हा संदेश आहे.
केसी त्यागी यांनी सांगितले की, नितीश कुमार यांना भाजप आणि एनडीएमध्ये परतण्यास भाग पाडले गेले. कारण काँग्रेस आणि इतर पक्षांची त्यांच्याशी असलेली वागणूक चांगली नव्हती. आता काहीही मिळाले तरी मागे वळून पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे स्वतः नितीश कुमार यांनी अनेकदा सांगितले आहे. या बांधिलकीचा परिणाम म्हणजे आज नितीशकुमार हे भाजप एनडीएच्या तिसऱ्या सरकारमधील सर्वात महत्त्वाचा दुवा बनले आहेत. आता ते मनापासून नरेंद्र मोदींसोबत आहेत आणि त्यांना बळ देण्यासाठी काम करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App