केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र अजून सुखी, समृद्ध. संपन्न, शक्तिशाली व्हावा, फक्त साधनांनी नाही तर साहित्य, संस्कृती, कला यांनीदेखल व्हावा असं गडकरींच स्वप्न आहे.
“मला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात,” दानवेंचा टोला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंतचा प्रवास, शिवसेना-भाजप युती, नारायण राणेंचं मंत्रिमंडळ असे विविध राजकीय किस्से सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा देखील किस्सा सांगितला. Nitin Gadkari: With the blessings of Balasaheb, Bhagwat Karad became the mayor: Gadkari told funny stories – Anravasaheb’s mischievous style ..
नितीन गडकरी म्हणाले, “डॉ. भागवत कराड हे संभाजीनगरमधील अतिशय उत्तम कार्यकर्ते. महानगरपालिकेचे महापौर होते. त्यांना महापौराच्यावेळी अडचण होती. शिवसेना आणि भाजपमध्ये टाय होती. त्यावेळी भाजपचा महापौर होणं शक्य नव्हतं. त्यावेळी हे सगळे आले आणि म्हणाले बाळासाहेबांकडे फक्त तुम्हीच जाल आणि बाळासाहेब तुमचं ऐकू शकतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यावेळी मी बाळासाहेबांना म्हणालो, भाजपला संधी द्या, कारण कराडसारखा चांगला माणूस महापौर होईल, अशी विनंती केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी आमची संख्या कमी असतानाही त्यावेळी परवानगी दिली आणि त्यांच्या आशिर्वादाने भागवत कराड महापौर झाले.
“दिल्लीमध्ये मी अपघाताने आलो. मी येण्यासाठी तयार नव्हतो. जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी संस्कृती. मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी इतिहास हा एकदम वेगळा आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण मराठी सारस्वाताचा आणि महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र औद्योगिक तसंच साहित्य, संस्कृती, इतिहास या सर्व गोष्टींमध्ये पुढे आहे. संगीत, गाणं, चित्रपट सगळ्या बाबतीत मराठी माणसाचा दबबबा आहे. महाराष्ट्र अजून सुखी, समृद्ध. संपन्न, शक्तिशाली व्हावा, फक्त साधनांनी नाही तर साहित्य, संस्कृती, कला यांनीदेखल व्हावा असं स्वप्न आहे”.
रावसाहेब दानवेंनी यावेळी आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, पण तुम्ही नशीबवान आहात असं म्हणत भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला.
“आपण केंद्रात मंत्री झालात. आता हा अनुभव वेगळाच आहे. आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली. मला ४२ वर्ष लागली पण तुम्ही सहा महिन्यात काम केलं. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम मंत्रिमंडळात कराल,” असं रावसाहेब दानवे भागवत कराडांचा उल्लेख करत म्हणाले. कपिल पाटीलदेखील मी नवीन आहे म्हणाले. तुम्ही सात वर्षात राज्यमंत्री झालात हे पण काही कमी नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App