
वृत्तसंस्था
टोकियो – टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये भारताच्या भाविका पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक मिळविल्या पाठोपाठ भारतीय खेळाडूंनी आणखी पदकांचा धमाका केला असून निशाद कुमारने टी ४६ उंच उडीत रौप्य पदक मिळविले आहे, तर विनोद कुमार याने थाळी फेकीत ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले आहे. Nishad Kumar wins silver medal in T46 high jump event, creates Asian Record
Vinod Kumar wins bronze medal in Discus Throw F52 at Tokyo #Paralympics
(file pic) pic.twitter.com/pqapALYtDi
— ANI (@ANI) August 29, 2021
Tokyo Paralympics: Nishad Kumar wins silver medal in T46 high jump event, creates Asian Record
Read @ANI Story | https://t.co/LLQ6eX4EXL#Paralympics pic.twitter.com/8BJVkHUiKQ
— ANI Digital (@ani_digital) August 29, 2021
निशाद कुमारने रौप्य पदक पटकावताना आशियायी विक्रम तोडला आहे. निशाद कुमारने २.०६ मीटर उंच उडी मारली. अमेरिकेच्या रॉड्रीक टाऊनसेंड याने २.१५ मीटर उंच उडी मारून सुवर्ण पदक पटकावले. डल्लास वाईज यानेही २.६ मीटर उडी मारली होती. परंतु, पहिल्या फेरीत त्याने २.०० मीटर उंच उडी मारली होती, तर निशाद कुमार याने २.०२ मीटर उंच उडी मारली होती. त्यामुळे निशादला रौप्य पदक देण्यात आले. डल्लास वाईजनेही दुसरेच स्थान पटकावले. भारताच्या रामपाल छाचर याने १.९४ मीटर उंच उडी मारली. त्याने पाचवे स्थान पटकावले.
विनोद कुमार याने थाळीफेकीत ब्राँझ पदक पटकावले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांनी पदके पटकावणाऱ्या खेळांडूंचे अभिनंदन केले आहे.
Nishad Kumar wins silver medal in T46 high jump event, creates Asian Record
महत्त्वाच्या बातम्या
Array