‘निपाह’ व्हायरस ‘कोरोना’पेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के – ‘ICMR’चा इशारा!


विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेले केंद्रीय पथक केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात पोहोचले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतर देशात निपाह विषाणूच्या प्रवेशाने सगळ्यांना घाबरवले आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसची प्रकरणे आढळताच वैद्यकीय संस्थांनी इशारे देणे सुरू केले आहे. दरम्यान, इंडियन काॅन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले आहे. Nipah virus is more dangerous than Corona death rate is 40 to 70 percent  ICMR warning

निपाह संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण 40-70 टक्के आहे, तर कोरोनामध्ये ते 2 ते 3 टक्के आहे. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये सध्या निपाह विषाणूचे 6 रुग्ण आढळले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था 24 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडियन काॅन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक राजीव बहल म्हणाले की, केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.  परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेले केंद्रीय पथक कोझिकोड जिल्ह्यात पोहोचले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत एक हजारांहून अधिक लोकांचा शोध घेण्यात आला आहे.

ICMR अधिकाऱ्याने निपाह व्हायरसच्या प्रतिबंध आणि प्रसाराविरूद्ध घ्यायच्या खबरदारीच्या पावलांची माहिती देताना,  वारंवार हात धुण्यास आणि फेस मास्क घालण्यास सांगितले आहे. राजीव बहल म्हणाले, ‘चार-पाच  प्रमुख उपाय आहेत, त्यापैकी काही कोविड विरूद्ध केलेल्या उपायांप्रमाणेच आहेत. जसे की वारंवार हात धुणे, मास्क घालणे. निपाह विषाणूचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे आणि त्यानंतर संक्रमित व्यक्तीला भेटलेल्या अन्य व्यक्तीच्या संपर्कात येणे. हे टाळण्यासाठी, विलगीकरण करणे फार महत्वाचे आहे. विलगीकरण देखील संरक्षणाची एक पद्धत आहे. लक्षणे दिसू लागल्यास, त्या व्यक्तीने स्वतःला विलग केले पाहिजे आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Nipah virus is more dangerous than Corona death rate is 40 to 70 percent  ICMR warning

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात