वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्ययन करणारे विख्यात भारतीय- अमेरिकी गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना पहिला सिप्रियन फोयस पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. ५ जानेवारी २०२१ रोजी सिएटल येथे होणाऱ्या संयुक्त गणित परिषदेत पुरस्कार वितरण होणार आहे. गणित क्षेत्रातील ही परिषद जगातील सर्वांत मोठी समजली जाते. श्रीवास्तव यांना यापूर्वी जॉर्ज पोलिया व हेल्ड या पुरस्काराने गौरविण्या त आलेले आहे. Nikhil Shrivastav gets Math award
अमेरिकन मॅथमॅटिकल सोसायटी’ या संस्थेच्यावतीने (एएमएस) ‘ऑपरेटर थिअरी’ या विषयासाठी श्रीवास्तव यांच्यासह ॲडम मारकस आणि डॅनिअल स्पिलमन यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मारकस हे स्वित्झर्लंडमधील ‘पॉलिटेक्निक फेडरल द ल्युसेन’ (ईपीएफएल) या संस्थेतील कॉम्बिनेटोरियल ॲनॅलिसिस या विभागाचे अध्यक्ष आहेत.
स्पिलमन हे संगणक विज्ञान, संख्याशास्त्र आणि डेटा विज्ञान, गणिताचे प्राध्यापक आहेत. ‘इटेरिटिव्ह स्पारस्फिकेशन’ (बॅस्टन विद्यापीठाच्या सहकार्याने) आणि ‘इंटरलेसिंग पॉलिनॉमिनल’ या गणितातील बहुपदी सारिणीचे वैशिष्ट्य समजावून सांगणाऱ्या पद्धती विकसित करण्यासंबंधी योगदान देणाऱ्यांसाठी हा पुरस्कार महत्त्वपूर्ण आहे, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App