वृत्तसंस्था
बंगळूर : कर्नाटक राज्यातील रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यु ) ३१ जानेवारीनंतर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नाईट लाईफ पूर्ववत सुरु होणार आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेतला आहे. Night curfew lifted in Karnataka Corona control; Nightlife resumed
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नाईट कर्फ्यु लागू केला होता. परंतु कोरोनाचे संकट आणि संक्रमण कमी झाल्याने तो रद्द केला आहे. तसेच हॉटेल, बार आणि पबवरील ५० टक्के क्षमतेचे निर्बंधही हटवले जाणार आहेत. तसेच सोमवारपासून बंगळुरूमधील सर्व शाळांमध्ये ऑफलाइन अभ्यास सुरू होणार आहेत.
दरम्यान, कर्नाटकातील कोरोनाचे संकट दूर होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारकडून आरपीसीआर निगेटिव्ह अहवालाची सक्ती प्रवाशांवर केली जात आहे. त्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App