एअर इंडियाच्या प्रवाशांना धमकावले होते
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दरम्यान, NIA ने सोमवारी (20 नोव्हेंबर) शीख फॉर जस्टिस (SFJ) चे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याविरुद्ध एअर इंडियावर उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. NIA files a case against terrorist Gurpatwant Singh Pannu
एनआयने घोषित दहशतवादी पन्नूविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०बी, १५३ए आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 10, 13, 16, 17, 18, 18 ब आणि 20 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खलिस्तान्यांची मुजोरी वाढली, आता अमेरिकेसह G-7 देशांमध्ये काढणार ‘किल इंडिया’ रॅली
वास्तविक, नुकताच पन्नूचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने १९ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना धमकावले होते. एनआयएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पन्नूने ४ नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये तो शीखांना 19 नोव्हेंबरपासून एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असे म्हटले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App