Visakhapatnam : विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणात NIAने आणखी तिघांना केली अटक

Visakhapatnam

ते आयएसआयला संवेदनशील माहिती पुरवत होते.


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : Visakhapatnam देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने कर्नाटक आणि केरळमधून ३ जणांना अटक केली आहे. एनआयएला संशय आहे की हे तिघेही आरोपी पाकिस्तानच्या आयएसआयशी जुडलेल्या विशाखापट्टणम हेरगिरी प्रकरणात सहभागी आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनआयएने मंगळवारी ही कारवाई केली. एनआयएला संशय आहे की हे तिघेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते आणि देशाशी संबंधित संवेदनशील माहिती त्यांच्यासोबत शेअर करत होते.Visakhapatnam

एनआयएने मंगळवारी पोलिस पथकासह कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील वेतान लक्ष्मण तांडेल आणि अक्षय रवी नाईक यांना अटक केली. तर, अभिलाष पी.ए. याला केरळमधील कोची येथून त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत, एनआयएने या प्रकरणात एकूण ८ जणांना अटक केली आहे, ज्यात या लोकांचा समावेश आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी सोशल मीडियाद्वारे पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या संपर्कात होते.



एनआयएच्या तपासानुसार, ते कारवार नौदल तळ आणि कोची नौदल तळावरील भारतीय संरक्षण आस्थापनांबद्दल संवेदनशील माहिती शेअर करत होते आणि त्या माहितीच्या बदल्यात पीआयओकडून पैसे घेत होते. एनआयएने आतापर्यंत पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात दोन फरार पाकिस्तानी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

NIA arrests three more in Visakhapatnam espionage case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात