विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लसीकरणाबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून निरर्थक वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे जनतेच्या मनात अकारण भीती निर्माण होत असल्याची टीका नूतन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे. भ्रम आणि चिंतेचं वातावरण पसरवणारी वक्तव्य करणाºया नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. हे नेते शासनप्रक्रिया आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींपासून इतके दूर आहेत की त्यांना लसीकरणाबद्दल जी माहिती दिली जाते, त्याबद्दलही काही कल्पना नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. New Union Health Minister Mansukh Mandvi lashes out at critics for making baseless statements about immunization
देशाच्या आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्विकारलेल्या मनसुख मांडवीय यांनी लसीकरणावरुन टीका करणाऱ्याना फटकारले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण व्हावे यासाठी जून महिन्यात ११.४६ कोटी डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. जुलैमध्ये डोसची संख्या वाढवून १३.५० कोटी करण्यात आली. जुलैमध्ये राज्यांना किती डोस दिले जातील याची माहिती केंद्र सरकारने राज्यांना १९ जूनलाच दिली होती. त्यानंतर २७ जून आणि १३ जुलैला केंद्राने राज्यांना आधीच लसींबाबतची बरीचशी माहिती दिली होती. त्यामुळे राज्यांना हे अगदी व्यवस्थित माहित आहे की त्यांना कधी किती डोस मिळणार आहेत. कोणालाही काही अडचण येऊ नये यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आता जर केंद्र सरकारने आधीच राज्यांना लसीच्या उपलब्धतेबद्दलची माहिती दिली असेल आणि तरीही अयोग्य व्यवस्थापन आणि लस घेण्यासाठीच्या लांब रांगा अशा समस्या येत असतील तर त्याचं कारण स्पष्ट आहे.
लसींच्या उपलब्धतेबाबत मला अनेक राज्यांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून पत्राद्वारे किंवा चचेर्तून माहिती मिळालेली आहे. त्या आधारावर सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. मात्र नेत्यांची अशी निरर्थक वक्तव्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी केली जात आहेत.
कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी लसीकरणावरून केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत आहे. मंत्रीमंडळाच्या पुर्नरचनेनंतर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, मंत्र्यांची संख्या वाढली पण कोरोना लसींची नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारची लसीकरण रणनिती नोटाबंदीपेक्षा कमी नाही. शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार आहे, असे म्हटले होते. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी विक्रमी लसीकरण केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेत असतानाच दुसऱ्याच दिवशी देशातल्या लसीकरणाचा आकडा तब्बल ४० टक्यांनी घटला. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी कोव्हॅक्सिन या भारतीय लसीबाबत संभ्रम निर्माण केला होता. क्लिनिकल ट्रायलचे अहवाल प्रकाशित केले नाहीत असे म्हटले होते. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्यांना मांडवीय यांनी चांगलेच सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App