संपूर्ण देशात मोदी 400 पारची चर्चा; पण नेते पक्षात टिकवून ठेवण्याची पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादींना चिंता!!

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान सुरू असताना एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर यायला अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर मोदी 400 पार होतील की नाही??, याची चर्चा रंगली आहे. त्या उलट शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत किती मते मिळवतील??, यापेक्षा प्रत्यक्ष निकाल नंतर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये नेते टिकून राहतील की नाही??, याची चिंता लागली आहे.New splits in both the NCPs inevitable after 4 June 2024



वास्तविक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने 272 चा आकडा गाठला तरी भाजपचेच सरकार स्थापन होणार आहे. त्याविषयी कायदेशीर दृष्ट्या कुठलीही शंका राहणार नाही. पण मोदींनी पक्षासाठी असे काही टार्गेट सेट केले आहे, की भाजपला नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कष्टपूर्वक एकूण मतदानाच्या 50 % मते खेचून आणून पक्षाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 पेक्षा जास्त खासदार मिळवून द्यावेत. त्यामुळे मोदींचे यश किंवा अपयश 272 या आकड्यावर तपासले जाण्यापेक्षा ते 400 आकड्यावरच तपासले जाणार आहे. कारण मोदींनीच स्वतः तो आकडा सेट करून दिला आहे.

त्या उलट महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फुटल्याने या दोन्ही नेत्यांच्या बाजूने प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आहे, या सहानुभूतीच्या लाटेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वाहून जातील. भाजपला देखील प्रचंड मोठा धक्का बसेल. असे “पॉलिटिकल पर्सेप्शन” “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी तयार केले आहे, पण हे पर्सेप्शन तयार करूनही मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या दिवशी एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर यायला काही तास उरले असताना प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपापले नेते टिकून राहतील की नाही??, याविषयी चिंता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस 4 जून नंतर फुटणार असे दावे – प्रतिदावे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर शरसंधान साधताना केले आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये निघून जातील. अजित पवारांबरोबरचे बहुतांश आमदार त्यांच्याबरोबर असतील किंवा ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत येतील, पण सुनील तटकरे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मेहबूब शेख यांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षातून फुटून काँग्रेसमध्ये जातील. त्यांनी सोनिया गांधींकडे 4 जून रोजीची अपॉइंटमेंट मागितली आहे, असा दावा केला.

सुरज चव्हाण यांच्या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जशी गळती लागली, तशीच गळती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागणार असल्याचे “भाकीत” संजय शिरसाट यांनी वर्तविले. ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व झुगारून सोनिया दुहान ही फायर ब्रँड नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडली, तसेच आमदार रोहित पवारांचे नेतृत्व जुगारून जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडतील आणि काँग्रेसमध्ये निघून जातील, असा दावा सुरज चव्हाण आणि संजय शिरसाट यांनी केला.

एकूण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी किती मते मिळवेल?? त्यांनी लढविलेल्या लोकसभेच्या 10 पैकी नेमक्या किती जागा मिळतील??, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढविलेल्या 5 जागांपैकी पैकी त्यांना नेमक्या किती जागा मिळतील??, याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाहीच, उलट 4 जून नंतर राष्ट्रवादी पक्षच फुटतील, असे दावे मात्र दोन्ही पक्षांचे प्रवक्ते करत आहेत. यातून पवार काका – पुतण्यांचे सगळे “राजकीय संचित” किती मोठे आहे आणि त्यांचे “राजकीय भवितव्य” किती “उज्ज्वल” आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड्यावर येऊन पडले आहे!!

New splits in both the NCPs inevitable after 4 June 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात