विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सन 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा राजकीय पॅटर्न 2021 च्या अखेरीपासून उदयाला येताना दिसतो आहे, तो म्हणजे सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची राजकीय लढाई भाजपच्या विरोधात आहे.New pattern of 2022; Of all regional leaders Fight against BJP, but intense attacks But on Congress
पण सर्व प्रादेशिक नेते प्रखर हल्ले मात्र काँग्रेसवर चढवताना दिसत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आघाडी घेतली आहे.
हे सर्व नेते आपापल्या राज्यांमध्ये मजबुतीने प्रादेशिक राजकारण करताना दिसताहेत. पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात त्यांची मुख्य लढाई केंद्रातील सत्ताधारी भाजपशी आहे, पण ही लढाई करत असताना हे सर्व नेते आपल्या प्रचाराच्या तोफा मात्र प्रामुख्याने काँग्रेसवर ङागताना दिसत आहेत. भाजपशी लढाई करण्यात काँग्रेस कमी पडते आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसलाच पुढे येऊन भाजपशी राजकीय लढाई करावी लागेल, असे प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी गोव्याच्या दौऱ्यात केले आहे.
जवळजवळ त्याचाच पुनरूच्चार अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या दौऱ्यात करून त्यामध्ये भर घातली आहे. भाजप आणि काँग्रेस यांचेच साटेलोटे आहे. दोन्ही पक्ष मिलीभगत करून मलई खातात. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरोधात आरोप करीत असले तरी प्रत्यक्ष कारवाई करीत नाहीत, असा आरोप केजरीवाल यांनी गोव्यात पत्रकार परिषदेत केला आहे.
ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांचीच री ओढत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस राजकीय दृष्ट्या खिजगणतीतही नाही, अशी टीका समाजवादी विजयी यात्रेत केली आहे, तर मायावती यांनी देखील काँग्रेस पक्ष भाजपची लढण्यास सक्षम नाही, असा आरोप करून घेतला आहे.
ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल अखिलेश यादव आणि मायावती या चारही नेत्यांच्या आरोपांचे वैशिष्ट्य असे, की काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात आपले हल्ले प्रखर केले आहेत.
एक प्रकारे भाजपशी राजकीय लढाई करत असताना या सर्व प्रादेशिक नेत्यांनी आपल्या प्रचाराच्या तोफा काँग्रेसच्या दिशेने वळवून डागायला सुरुवात केली आहे.हा विधानसभा निवडणुकीपूर्वी चा नवा प पॅटर्न दिसतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App